Take a fresh look at your lifestyle.

2022 वर्षांमध्ये या कलाकारांच्या निधनानं पोरकी झाली चित्रपटसृष्टी

0

भारतातील मनोरंजनसृष्टीतील कलाकारांचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. भारतातील सर्वच कलाकार आपपल्या कलेनं प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात. परंतु 2022 हे वर्ष मनोरंजनसृष्टीतील कलाकारांसाठी खूप वाईट होते. कारण या वर्षात अनेक दिग्गज कलाकारांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनानं आजही मनोरंजनसृष्टी शोककळा आहे.

पंडित बिरजू महाराज : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं 17 जानेवारी 2022 रोजी निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

अभिनेते रमेश देव : अष्टपैलू अभिनयाच्या बळावर मराठी नाट्य-चित्रपट रसिकांच्या मनावर अनेक दशकं अधिराज्य गाजवणारे महान कलावंत अभिनेता रमेश देव यांचे 2 फेब्रुवारी 2022 रोजी निधन झाले आहे . हृदयविकाराच्या झटक्याने वयाच्या 93 व्या वर्षी प्राणज्योत मालवली.

लता मंगेशकर : ‘क्वीन ऑफ मेलोडी’ आणि ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ या नावाने प्रसिद्ध लता मंगेशकर यांचे 6 फेब्रवारी 2022 रोजी वयाच्या 92 वर्षी मल्टीपल ऑर्गन डिसफंक्शन सिंड्रोम मुळे निधन झाले. ही भारतीय चित्रपटसृष्टीची कधीही भरून न येणारी हानी आहे.

बप्पी लाहिरी : लता मंगेशकर यांच्या निधनाने संपूर्ण देश रडला होता, लोक या धक्क्यातून बाहेरही आले नव्हते की नऊ दिवसांत ‘गोल्डन स्टार’ अर्थात बप्पी दा यांचे देखील निधन झाले. ते 69 वर्षांचे होते.

सिद्धू मुसेवाला : प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांची 29 मे 2022 रोजी भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सिद्धू मुसेवाला निधनानं त्यांच्या चाहत्यांना धक्का बसला होता.

कृष्णकुमार कुन्नथ (KK) : केके या नावाने प्रसिद्ध सिंगर कृष्णकुमार कुन्नत आपल्या सुंदर आवाजासाठी प्रसिद्ध होते. कोलकाता येथे एका कॉन्सर्टनंतर त्यांची तब्येत अचानक बिघडली यानंतर त्यांना एका रुग्न्यालयात घेऊन जाण्यात आले तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले.

प्रदीप पटवर्धन : प्रसिद्ध अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे आज 9 ऑगस्ट 2022 रोजी हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झाले. 65 व्या वर्षी त्यांनी राहत्या घरी (झावबावाडी, चर्नी रोड ) अखेरचा श्वास घेतला.

राजू श्रीवास्तव : अभिनेता आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांचं 21 सप्टेंबर रोजी निधन झालं आहे. वयाच्या 59 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राजू यांच्या निधनानंतर मनोरंजन क्षेत्रावर शोककळा पसरली

विक्रम गोखले : ज्येष्ठ अभिनेते विक्रम चंद्रकांत यांचे 26 नोव्हेंबर 2022 रोजी यांचे निधन झाले. वयाच्या 77 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. विक्रम गोखले यांनी रंगभूमी, मालिका आणि चित्रपट या तिन्ही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले. विक्रम गोखले यांनी आपल्या अभिनयानं अनेक रसिकांच्या मनावर छाप सोडली.

सुलोचना चव्हान : लावणीसम्राज्ञी आणि ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं 10 डिसेंबर 2022 रोजी निधन झालं आहे. वयाच्या 89 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज मुंबईतील गिरगावमधील फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांचे निधन झाले

Google Search In Year 2022 मध्ये नक्की काय सर्च केलं गेलं? गुगलच्या अहवालातून मजेशीर माहिती समोर

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues