Take a fresh look at your lifestyle.

Do you Know : राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व आमदाराला नेमका किती पगार असतो? पगाराचे आकडे पाहून तुम्ही व्हाल थक्क

0

Do you Know : राज्यात मागील काहीच दिवसांपूर्वी विधी मंडळ अधिवेशनात महाराष्ट्रासाठीचे बजेट सादर करण्यात आले. यात शेतकरी, महिला, कर्मचारी वर्ग यासह प्रत्येकासाठी अनेक तरतूद करण्यात आल्याचे शिंदे सरकारकडून सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे विरोधकांनी यंदाच्या या अर्थसंकल्पत केवळ गाजर हलवा असल्याचे सुद्धा म्हंटले आहे. एवढेच नव्हे तर शेतकऱ्यांना शेतमालासाठी कमी पैसे देण्याच्या वादावरून अनेक शेतकरी संघटना एक होऊन विधानभवनावर मोर्चाचे काढण्याच्या सुद्धा तयारीत आहेत. Do you Know : What is the exact salary of the Chief Minister, Deputy Chief Minister and MLA of the state? You will be amazed by the salary figures

मात्र एवढे असले तरी महाराष्ट्रातील विविध गटांच्या आर्थिक स्थितीविषयी बोलताना राज्याचे प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व जनतेने निवडून दिलेले आमदार यांना किती पगार मिळतो हे तुम्हाला माहितेय का? राज्य सरकारच्या पोर्टल्सवर उपलब्ध माहितीनुसार आज लोकप्रतिनिधींचे पगार किती हे आपण आजच्या लेखात जाणून घेऊया..

कोणाला किती पगार :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पगार सुमारे 3.40 लाखांच्या घरात आहे. यासह त्यांना मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता अशा विविध सुविधा आणि भत्ते सुद्धा दिले जातात. याशिवाय त्यांना आमदार म्हणून एका महिन्याचे वेतनही दिले जाते

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पगार : दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही पगार साधारण 3 लाखापर्यंत असून उपमुख्यमंत्र्यांना देखील मोफत निवास सुविधा आणि वैद्यकीय सेवा, प्रवास भत्ता, दूरध्वनी भत्ता अशा विविध सुविधा आणि भत्ते सुद्धा दिले जातात.

जनतेने निवडून दिलेल्या स्थानिक आमदारांचा पगार किती : सर्व पक्षांच्या निवडून आलेल्या आमदारांना एका महिन्याचा मूळ पगार साधारण 1 लाख 80 हजार इतका आहे. तर याव्यतिरिक्त महागाई भत्ता, दूरध्वनी आणि टपाल यासाठी भत्त्याची तरतूद आहे, असं मिळून हा आकडा 2 लाख 30 हजारांच्या घरात जातो.

तसेच माजी आमदारांना देखील 50 हजार पेन्शन म्हणून देण्याची सुद्धा तरतूद असल्याचे सांगण्यात येते. तर राज्यातील काही मंत्र्यांनी नियुक्‍त केलेल्या सल्लागारांनाही तिजोरीतूनच वेतन देण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues