Take a fresh look at your lifestyle.

Types of Farming : शेती करण्याच्या ‘या’ पद्धती माहित आहेत का ?

0

जमिनीची मालकी व संघटना आणि कार्यवाहीची पद्घती यांनुसारही शेतीचे वर्गीकरण करण्यात येते.

(१) किसानप्रधान शेती :
यात वैयक्तिकपणे शेतकरी स्वतःच्या पद्घतीने शेती करतात आणि आपल्या शेती व्यवसायाचे तेच व्यवस्थापक आणि संघटक असतात.

(२) सहकारी शेती :
या पद्घतीत शेतीची सर्वच्या सर्व किंवा काही कामे ही अनेक शेतकरी एकत्र येऊन स्वेच्छेने सहकारी पद्घतीने करतात. प्रत्येक शेतकऱ्याचा आपल्या शेतीवरचा हक्क कायम असतो. पण लागवडीच्या कामासाठी एकच परिमाण म्हणून अनेक शेतकऱ्याची जमीन एकत्र जोडली जाते. सहकारी शेतीचे अधिक चांगले असे संयुक्त शेती, सामूहिक शेती इ. प्रकार आहेत. मोठ्या प्रमाणावर लागवड करण्याचे कित्येक फायदे या सहकारी शेती पद्घतीत आहेत; परंतु वैयक्तिक उत्तेजनाचा अभाव यासारखे काही तोटेही या पद्घतीत आहेत.

(३) सामुदायिक शेती :
या पद्घतीत ‘समूह सदस्य ’ आपली स्वतःची बहुतेक जमीन आणि इतर साधनसामगी सोसायटीच्या स्वाधीन करतात. हे सदस्य एका ‘सर्वसाधारण व्यवस्थापक मंडळा’च्या नियंत्रणाखाली एकत्रितपणे काम करतात. कामाचा दिवस हे परिमाण धरून सदस्यांना मोबदला दिला जातो. सदस्यांच्या मुख्य उत्पन्नाची बाब म्हणजे समूहाला मिळणारा हंगाम आणि सदस्यांच्या वैयक्तिक मालमत्तेतून मिळणारा दुय्यम स्वरूपाच्या उत्पन्नाचा लहानसा भाग ही होय. या प्रकारची शेती पद्घती रशियात आणि चीनमध्ये थोड्याफार फरकाने रूढ आहे.

(४) भांडवलप्रधान शेती :
भांडवलाची आणि इतर साधनसामगीची अवाढव्य प्रमाणावर गुंतवणूक करण्याच्या भांडवली पद्घतीवर ही शेती आधारलेली असते. खाजगी मालकीचे आणि खाजगी रीतीने चालविलेले साखर कारखान्यांचे ऊस मळे हे याचे उदाहरण होय. जमीनमालक शेकडो पगारी नोकर कामाला लावतो आणि सर्व नफा स्वतः ठेवतो, अर्थात त्यातील काही भाग तो कामगारांना उत्तेजन मिळावे म्हणून खर्चही करतो.

(५) सरकारी शेती :
यात सरकार शेतीची व्यवस्था ही आपला स्वतःचा नोकर वर्ग नेमून किंवा अधिकृत मंडळाप्रमाणे एखादे व्यवस्थापक मंडळ नेमून पाहते. सरकारी मालकीचे आणि सरकारने चालविलेल्या अधिकृत मंडळाचे अगदी अलीकडील उदाहरण म्हणजे महाराष्ट्र राज्यातील महाराष्ट्र राज्य कृषि महामंडळ ही संस्था होय. भारत सरकारने चालविलेली राजस्थानातील सुरतगढ आणि जेटसर येथील यांत्रिकीकृत शेती ही या पद्घतीच्या शेतीची उदाहरणे होत. यांत्रिक शेती प्रकारामध्ये शेतीची बहुतेक सर्व कामे यंत्रांच्या साहाय्याने करवून घेतली जातात. भारतात या प्रकाराला वाव तसा कमीच असला तरी प्रायोगिक तत्त्वावर राजस्थानमध्ये वरील दोन ठिकाणी या शेती पद्घतीची सुरुवात करण्यात आलेली आहे

Soil For Crop : जाणून घ्या कोणती माती कोणत्या पिकासाठी उपयुक्त आहे?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues