Take a fresh look at your lifestyle.

धेनू ॲप-ठरतेय दुग्ध व्यवसायाची गुरुकिल्ली….

5

लॉकडाऊन मुळे सध्या सगळीच कामे ऑनलाईन पद्धतीने झाली आहेत पशुपालनातही सॉफ्टवेअरचा वापर व्हावा व त्या आधारे पशुपालकांना आपला व्यवसाय ऑनलाइन पद्धतीने करता यावा तसेच सुशिक्षित बेरोजगार तरुणांना सॉफ्टवेअरच्या आधारे पशुपालनासारख्या अधिक उत्पादन देणाऱ्या व्यवसायात उतरता यावे व त्यांची आर्थिक बाजू बळकट व्हावी तसेच बेरोजगार तरुणांनी आठ ते दहा हजार पगार असणाऱ्या नोकरीच्या मागे न लागता आधुनिक तंत्रज्ञान वापरून शेळीपालन, मेंढीपालन तसेच दुग्धव्यवसाय करावेत तसेच डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात आपला वेगळाच ठसा उमटवावा तसेच आपले नाव उज्वल करावे या उद्देशाने धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि.लिमिटेड कंपनीने पशुपालकांच्या निस्वार्थ सेवेसाठी दुग्धव्यवसायामध्ये होणाऱ्या चुका तसेच गरजा ओळखून आंतरराष्ट्रीय दर्जाचे दुग्धव्यवसायातील अत्याधुनिक माहिती देणारे धेनू ॲप शेतकऱ्यांसाठी मोफत उपलब्ध करून दिले आहे. कोणताही व्यवसाय यशस्वी करण्यासाठी त्या क्षेत्रातील गाडा अभ्यास तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा असतो. दररोज नवनवीन व्यवसायाची उत्पत्ती होत असते व काही उद्योगधंदे बंद देखील पडत असतात कारण त्याची कारणेही तशीच असतात. (उदा- माहिती व तंत्रज्ञानाचा अभाव, व्यवसायातील बदल, अपडेट न राहणे) कोणत्याही व्यवसायाचे फायदे तोटे जाणून न घेता तसेच त्या व्यवसायातील संपूर्ण माहिती न घेता व्यवसाय चालू केल्यास तोट्यात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सध्याच्या काळात स्मार्ट फोनमुळे जग अगदी जवळ येऊन ठेपले आहे, आपण जो विचार कराल ते आपल्या हातात अगदी सेकंदाच्या वेळेत उपलब्ध होत आहे. शहरी तसेच ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात स्मार्ट फोनचा वापर होताना दिसून येत आहे त्यामुळे तरुणांनी धेनू अँप सारखे आधुनिक तंत्रज्ञान अंगीकृत करून आपल्या व्यवसायात तसेच उत्पादनात वाढ करावी. कोरोना सारख्या काळात सुशिक्षित तरुणांच्या नोकऱ्या गेल्याने बरेच तरुण शेळीपालन तसेच दुग्ध व्यवसायात उतरले आहेत त्यांना धेनू ॲप नक्कीच वरदान ठरणार आहे.
कारण धेनू ॲप मध्ये ज्ञान, मंच, पशु बाजार आणि व्यवस्थापन हे चार विभाग दिले आहेत त्यामध्ये आपणाला ज्या प्राण्याची माहिती पाहिजे ती माहिती आपणाला एका सेकंदाच्या क्लिकवर मिळते त्यामुळे माहिती घेण्यासाठी लागणारा वेळ वाचतो आणि आपल्या अडचणींचे लवकर निराकरण होते.
चला तर मग जाणून घेऊया दुग्ध व्यवसायातील आधुनिक तंत्रज्ञान- धेनू अँप
१) मंच २) ज्ञान ३) पशु बाजार ४) व्यवस्थापन
१) मंच संबंधित-

या विभागात तुम्ही खूप साऱ्या शेतकऱ्यांसोबत संबंधित विषयावर चर्चा करु शकता.
आपल्या प्राण्यांसोबतचे किंव्हा गोठ्यातील नाविन्यपूर्ण बाबींचे फोटो ईथे आपण टाकू शकता.
धेनु अँप च्या माध्यमातून इतर पशुपालकांसोबत आपल्या ओळखी देखील होण्यास मदत होईल.
पशुपालकांच्या गोठ्यातील नवनवीन तंत्रज्ञानाविषयीची माहिती तुम्ही जाणुन घेऊ शकता.
पशुपालकांनी टाकलेल्या फार्म पोस्ट तुम्ही स्थानानुसारही शोधू शकता.
तुम्ही पोस्ट टाकण्यासाठी, फार्म पोस्ट तयार करा या बटनावर क्लिक केल्यानंतर नंतर आपणास आवडणारा फोटो अपलोड करु शकता.
पुढे तुम्ही अपलोड केलेल्या प्रतिमेसंदर्भात माहिती लिहू शकता तसेच प्राण्यांचा प्रकार निवडू शकता जसे की गाय,म्हैस,शेळी आणि मेंढी नंतर हॅशटॅग निवडून तुम्ही तुमची पोस्ट तयार करू शकता.
आपल्या गोठ्यातील सर्व गाई, म्हशी, शेळ्या, मेंढ्याच्या नोंदी या अँप मध्ये भरून व्यवस्थापनाचे नोटिफिकेशन मिळवू शकता.
तुम्ही आवडलेले फोटो लाईक केल्यास तसेच त्यावर टिप्पणी केल्यास आणि तो फोटो शेअर ही केल्यास आपणास रिवार्ड पॉईंट्स / बक्षिसे देखील मिळतील.
त्याच मोड्यूलमध्ये तुम्हाला प्रश्न/उत्तरे हा एक पर्याय दिसेल जिथे तुम्हाला पशुपालन व दुग्धव्यवसायाबद्दल असणारे सर्व प्रश्न ईथे प्रश्न विचारा या बटनावर क्लिक करुन तुमचे प्रश्न विचारू शकता त्यानंतर तिथे तुम्हाला चोवीस तासाच्या आत धेनू एक्स्पर्ट आपणास उत्तरे देतील.
आपणास काही आक्षेपार्ह मजकूर वाटल्यास पोस्टवर फ्लॅगचे बटन क्लिक करु शकता जेणेकरून ॲपकडून त्याची तपासणी करून ती पोस्ट डिलीट केली जाईल.

२) ज्ञान संबंधित-
हा विभाग पशुपालकांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी व त्या माहितीचा दररोजच्या व्यवस्थापनात उपयोग व्हावा यासाठी बनवला आहे.
या विभागात आपणाला पशुधनाविषयीची सखोल माहिती फोटो, आर्टिकल्स,व्हिडीओ आणि ऑडिओ स्वरूपात पाहायला मिळेल.
तुम्हाला आवडणारे आर्टिकल ईथे लाईकही करु शकता ते तुम्हाला माझी पसंत या विभागात दिसतील तसेच सर्वात लाईक झालेले आर्टीकल तुम्हाला सर्वात लोकप्रिय या विभागात दिसतील तसेच आपणास फायदेशीर वाटलेले आर्टिकल आपण इतर मित्रांना देखील पाठवू शकता.
जर तुम्हाला विशिष्ट प्रकाराबद्दल माहीती वाचायची किंवा ऐकायची असेल तर जसे की गाय,शेळी,आरोग्य,व्यवस्थापन,उत्पादकता,लसीकरण इत्यादी हॅशटॅग वर क्लिक करुन ती विशीष्ट प्रकारची माहिती घेऊ शकता.
जनावरांची निगा कशी राखावी व त्यांचे व्यवस्थापन कसे करावे, जनावरांना कोणत्या प्रकारचा चारा द्यावा, सकस चाऱ्याचे विक्रमी उत्पादन कसे घ्यावे, मुरघास कसा तयार करावा त्याचे पशु आहारातील फायदे काय आहेत?
ओल्या व सुक्या चाऱ्याचे पशुआहारातील महत्व काय आहे? टी.एम.आर म्हणजे काय? खनिज मिश्रणाचे महत्व काय आहे?
जनावरांचा गोठा कसा बांधावा तसेच त्याचे डिझाईन कसे असावे? तसेच मुक्त संचार गोठ्याचे फायदे काय आहेत?
गोठ्याचे सिझन नुसार व्यवस्थापन कसे करावे? तसेच नवजात वासराची निगा कशी राखावी? आजारी जनावरांचे व्यवस्थापन कसे करावे? तसेच वासरांच्या शिंग काळ्या कधी खुडाव्यात?
अश्या अनेक विषया संबंधित आधुनिक तंत्रज्ञान तसेच माहिती आपणास पाहावयास मिळेल
.
३) पशु बाजार संबंधित-
पशु बाजार हा विभाग तुम्हाला खुपच फायदेशीर ठरणारा आहे.
यामध्ये आपण घरबसल्या आपल्या परिसरातील विक्रिस असणारी जनावरे पाहू शकता.
विक्रिस असणाऱ्या प्राण्याची माहीती जसे की जनावराचा प्रकार, जात, लिंग, अपेक्षीत किंमत, तुमच्या पासुन तो किती अंतरावर आहे आणि त्याचे स्थान हे ही तुम्ही पाहू शकता.
प्राण्याच्या फोटोवर क्लिक केले असता तुम्हाला विक्रेत्याचा मोबाईल नंबर ही मिळेल जेणेकरुन तुम्ही त्याच्याशी सहजतेने संपर्क करुन जनावराची खरेदी विक्री करू शकता.
तुम्हाला विशिष्ट प्राण्याबद्दलच्या विक्री बद्दल माहिती घ्यायची असेल तर त्या किवर्ड वर तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला वर्गीकरण होऊन माहिती येईल.
तुम्हाला जर प्राण्याची विक्री करावयाची असेल तर तुम्ही यामध्ये खाली दिसणाऱ्या छोट्या प्राण्याच्या आयकॉन वर क्लिक करावे नंतर तिथे तुम्हाला दोन पर्याय दिसतील.
प्राणी व्यवस्थापन मधून प्राणी निवडा- यामध्ये जर तुम्ही प्राण्याचा प्रोफाईल पहिलाच सेव्ह केला असेल तर तिथुन प्राणी घेऊ शकता.
नवीन प्राणी विक्री करा- यामध्ये तुम्ही जनावराचा प्रकार आणि लिंग या प्रकारची माहिती भरून प्राणी विक्रीस ठेऊ शकता.
४) व्यवस्थापना संबंधित-
हा विभाग खास करून प्रौढ पशू व्यवस्थापन आणि बाल पशू व्यवस्थापन या संबंधित बनवला गेला आहे.
१) प्रौढ पशू व्यवस्थापन
आपण इथे आपल्या जनावरांसंबंधित प्रोफाइल तयार करु शकता.
तुम्हाला खाली उजव्या बाजुला असणाऱ्या प्रोफाइल बनवा या हिरव्या बटनावर क्लिक करून प्राण्याची संपूर्ण माहिती भरू शकता. आणि तिथे सर्व माहिती भरल्यानंतर खाली प्रौढ पशु प्रोफाइल तयार करा या हिरव्या बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या प्राण्याचा प्रोफाईल तयार होईल.
त्यानंतर तुम्ही प्रजनन स्थितीवर क्लिक करावे आणि त्या प्राण्याची डिलीवरी, पहिली हीट, पहीले क्रतिम रेतन याची तारीख भरावी नंतर अपेक्षीत तारीख आपोआप पुढे येईल आणि त्यानुसार आपणाला वेळेवर नोटिफिकेशन मिळतील.
अश्याच प्रकारे आपण लसिकरण केलेल्या तसेच जंतनाशक दिलेल्या तारखा टाकु शकता जेणेकरून तुम्हाला अपेक्षीत तारखा पुढे येतील आणि त्याप्रमाणे नोटिफिकेशन वेळेवर मिळत राहतील.

२) बाल पशु व्यवस्थापन-
प्रौढ पशू व्यवस्थापन प्रमाणेही बाल पशु व्यवस्थापन हि आपण वापरु शकतो.
यामध्ये वासराच्या वाढीची स्थिती किती आहे?,जंतनाशक कधी दिले? आणि लसीकरण कधी केले? याच्या तारखा टाकल्या तर पुढच्या तारखा आपोआप अपेक्षीत दिनांक मध्ये प्रविष्ट होतील.
या विभागात आपल्याला शेळी, गाय, म्हैस, मेंढी हे किवर्ड दिसत आहेत ज्यावर क्लिक केले की आपल्याला त्या विशीष्ट प्राण्याबद्दलची माहिती दिसेल.
या व्यवस्थापन या विभागामध्ये आपल्याला वरती उजव्या बाजुला घंट्याचे चिन्ह दिसेल ज्यावर क्लिक केले की आपल्याला आलेल्या सर्व नोटिफिकेशन दिसतील. उदा- तुमची गिता शेळी २९ डिसेंबर ते ३ जानेवरी या दरम्यान हिटवर येऊ शकते. या नोटिफिकेशनमुळे उपाययोजना करणे सोपे जाते.
धेनू अँप जनावरांच्या अचूक नोंदींची दखल घेते त्यामुळे जनावरांच्या व्यवस्थापनात अडचण निर्माण होत नाही उलट व्यवस्थापन चांगले झाल्याने जनावरांचे आरोग्य चांगले राहते जनावरे आजारी पडत नाहीत त्यामुळे दूध उत्पादन टिकून राहते.
प्राण्यांची शिंगे काढण्याचे फायदे काय आहेत या विषयीची माहिती आपणाला इथे मिळेल.
व्यवस्थापना संबंधित नवनवीन माहिती आपणाला ऑडिओ मार्फतही ऐकायला मिळतील.
या ॲपमध्ये होमपेजवर वरती डाव्याबाजुला हॅमबर्गर मेंनू दिसेल ज्या आडव्या तिन रेषा आहेत यावर क्लिक केले असता तिथे तुम्हाला तुमचा प्रोफाइल फोटो दिसेल.
तुम्हाला तुमच्या ॲपची भाषा बदलता येईल तसेच तुम्हाला आवडलेली पोस्ट पाहता येईल.
तुम्ही विक्रीस ठेवलेल्या प्राण्यांच्या पोस्ट दिसतील तसेच आवडलेली विक्री पोस्ट पाहता येईल.
धेनू ॲप मोफत असल्याने आपण इतर पशुपालकांना आपण शेयर करु शकता त्याचा फायदा तुम्हालाही आणि त्यांना हि फायदा घेता येईल तसेच तुमच्या मार्फत जे शेतकरी ॲप डाउंनलोड करतील तेही तुम्हाला दिसतील त्यांच्यामुळे तुमचे रिवार्डस पॉईंट्स वाढल्याने धेनू अँप कडून आपणांस आकर्षक बक्षिसे मिळतील.
अश्या प्रकारे आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात मराठी भाषेत प्रकाशित झालेले व पशुपालकांच्या अविरत सेवेसाठी तयार असणारे तसेच वापरण्यास अगदी सुलभ,सोपे आणि सुटसुटीत असणारे धेनू ॲप हे नक्कीच बळीराजा एक आदर्श पशुपालक व या क्षेत्रातील हुशार व्यक्तिमत्व बनवण्यास कामी येईल

• टीप- पशुपालन व दुग्धव्यवसायातील आधुनिक माहिती व डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोअर वरून धेनू ॲप डाऊनलोड करा आणि आपला व्यवसाय दुपट्टीने वाढवा.

  • नितीन रा.पिसाळ
    प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
    धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि.भोसरी, पुणे.
    मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]

5 Comments
  1. NITIN RAMHARI PISAL says

    धेनू ॲप खरंच दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आत्मा म्हटलं तरी काय वावगे ठरणार नाही👌👍👍👍👍

  2. Dipali R Bahiram says

    धेनू ॲप एक उत्तम मार्गदर्शक ठरले आहे, भाषा, तसेच ॲप मधे असणारा बाजार या विभागाचा उपयोग झाला,
    धन्यवाद धेनू ॲप🙏

  3. Nilesh Pawar says

    खरंच धेनु ॲप मुळे जनावरांची विक्री सहजरीत्या करता येते

  4. Rahul Galande says

    धेनु अँप शेतकऱ्यांच्या खूप फायद्याचे आहे

  5. Abhijeet khawale says

    धेनु ॲप खरंच खूप चांगला आहे त्यामुळे मी माझ्या जनावरांची खरेदी-विक्री करू शकलो व त्यामध्ये अजून अशा बऱ्याच गोष्टी आहे त ज्या पशुपालकांची खूप मदत करू शकतात

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues