Take a fresh look at your lifestyle.

घरच्या घरी असे बनवा अग्नी अस्त्र कीटकनाशक…!

0

रासायनिक खतांच्या दुष्परिणाम पाहता जमिनीची सुपीकता व जमिनीतील सूक्ष्म जीवांची जिवाणूंची संख्या दिवसेंदिवस घटत चालली आहे. तसेच याचा विपरीत परिणाम पिकांच्या उत्पादकतेवर देखील होत आहे.

त्यामूळे आता रासायनीक शेतीला अलविदा म्हणायची वेळ आली आहे. तसेच जर विचार केला तर आपण विविध किटकनाशके बनवू शकतो. उदा. अग्नी अस्त्र , निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क. आपण जर यांची फवारणी केली तर नक्कीच शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन जास्त मिळवू शकते. म्हणूणच आज एक महत्वाचे कीटकनाशक म्हणजे अग्नी अस्त्रविषयी जाणून घेऊयात…

साहित्य :
देशी गायीचे गोमुत्र – २० लिटर
हिरव्या मिरचीची चटणी – ५०० ग्रॅम
गावराण लसूणाची चटणी – ५०० ग्रॅम
कडुलिंबाच्या पानांचा लगदा – ५ किलो
१ किलो तंबाखू बारीक करून

बनवायचे कसे? : सर्वप्रथम वरील सर्व साहित्य एका पात्रात घ्या. त्यास आचेवर ठेवून चार ते पाच उकळ्या येउ द्या. त्यानंतर हे द्रावण आचेवरून उतरवुन थंड होऊ द्या. जवळपास दोन दिवसानंतर सदर द्रावण फडक्याने गाळून घ्या. जर आपल्यास लगेच वापर करायचा नसेल तर प्लास्टिक किंवा काचेच्या पात्रात साठवून ठेवा. या द्रावणाचा प्रभाव बनविल्यापासून ३ महिन्यांपर्यंत तसाच राहतो. मात्र या काळानंतर द्रावणाची कीटनाशक शक्ती कमी होत जाते.

द्रावण कशासाठी उपयुक्त आहे? : हे द्रावण पिकांच्या शेंगा व फळे पोखरणारी अळी, पाने खाणारी अळी यांच्या प्रादुर्भावापासून नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त आहे.

१०० लिटर पाण्यात ३ ते ५ लिटर अग्नीअस्त्र या प्रमाणात मिसळून पिकांवर फवारावे. हे द्रावण सामग्रीत किरकोळ बदल केला असता देशभरात विविध नावाने प्रचलित आहे. द्रावणातील तिखट अर्क फवारणीद्वारे त्यांच्या त्वचेवर पडताच श्वसनावरोध (श्वसनास अडथळा) होऊन त्या मरतात किंवा निष्प्रभ होतात.

ही फायदेशीर माहिती नक्की शेअर करा.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues