Take a fresh look at your lifestyle.

कृषी पदवी धारक आहात? असा घ्या अ‍ॅग्री क्लिनिक किंवा अ‍ॅग्रो बिझेनेस सेंटर योजनेचा लाभ

0

गेल्या दीड वर्षांपासून संकट काळात फक्त शेती इंडस्ट्री अहोरात्र सुरु आहे. त्यामुळे जगाला शेतीचे महत्व पुन्हा एकदा नव्याने कळाले आहे. कृषी आणि कृषी निगडित सेवा आणि करिअर यांना आगामी काळात सुगीचे दिवस येतील यात शंका नाही.

आज आपण कृषी पदवी धारकांना अ‍ॅग्री क्लिनिक किंवा अ‍ॅग्रो बिझेनेस सेंटर योजनेचा लाभ कसा घेता येईल? याविषयी जाणून घेणार आहोत.

कृषी पदवी धारकाने या योजनेअंतर्गत तंत्रज्ञान प्रसाराने पिकांचे रोग व किड नियंत्रण आदी बाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणे अपेक्षित आहे.

याअंतर्गत वैयक्तिक कर्जासाठी १० लाखांची तर संयुक्तपणे घेतलेल्या प्रकल्पास ५० लाखांची मर्यादा आहे.

रु. ५ लाख पर्यंतच्या कर्जास मार्जनची आवश्यकता नाही. यापुढील कर्जास अ. जा/ महिला लाभार्थीसाठी नाबार्डच्या मार्जीन मनी असिस्टोन्स योजनेखाली ५०% मार्जीन मनी उपलब्ध आहे.

लाभार्थ्यास कर्जाशी निगडीत २५ % तर अजा / अजा महिला लाभार्थ्यास ३३ % अनुदान उपलब्ध आहे. सदर रक्कम ३ वर्षे पूर्ण झाल्यावर मिळते. दरम्यान पहिली दोन वर्षे कर्जावरील पूर्ण व्याज रकमेचे अनुदान देखील मिळते.

वरील दोन्हीही प्रकारचे अनुदान बँक कर्जाचे नियमितपणे परतफेड करणाऱ्यासच मिळते. परतेफेडीचा कालावधी प्रकल्पानुसार ५ ते १० वर्षे असू शकतो.

उपरोक्त योजने अंतर्गत निवड झाल्यावर मान्याप्राप्त प्रशिक्षण संस्थेत विना शुल्क प्रशिक्षाणची सोय देखील आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues