Take a fresh look at your lifestyle.

शेळ्या व मेंढ्यांसाठी पौष्टिक चारा दशरथ घास…

0

दशरथघास हे द्विदलवर्गीय,बहुवार्षिक व पौष्टिक चारा पीक आहे.
• या चाराच्या मुळावरती रायझोबियम जिवाणूंच्या गाठींची संख्या जास्त असल्यामुळे जमिनीचे
आरोग्य चांगले राहते.
• दशरथघासा चा उपयोग हिरवळीचे खत म्हणून हि करता येतो.
• दशरथघास हा हिरवागार, कोवळा, लुसलुशीत व सकस स्वरूपाचा असतो.
• दशरथघासाला शेळ्या,मेंढया,गाई,म्हशी,घोडे इत्यादी सर्व पशुधन खूप आवडीने खातात.
• दशरथ घासासाठी हलक्या ते मध्यम प्रकारची जमीन उपयुक्त असते.
• सुपीक जमिनीत दशरथ घासाचे पीक घेतल्यास अधिक उत्पादन मिळते.
• दशरथ घासाची पेरणी शक्यतो जून किंवा जुलै महिन्यांत पाऊस पडल्यानंतर करावी.
• दशरथ घासासाठी हवामान शीतोष्ण व समशीतोष्ण असल्यास लागवड यशस्वी होते.
• दशरथ घासाचे बीज कवच कठीण असल्यामुळे पेरणी आधी हे बियाणे रात्रभर पाण्यात भिजत ठेवावे
व दुसऱ्या दिवशी पाण्यातून काढून दोन तास सावलीत वाळवल्यानंतर जिवाणू संवर्धकाची
बीजप्रक्रिया करावी तसेच एक किलो बियाण्यास ५ मि.लि रायझोबियम वापरावे व नंतर पेरणी
करावी.
• एका किलो बियाणे साधारणतः अडीच ते तीन गुंठयासाठी पुरते.
• पेरणीच्या वेळेस शेतात कुजलेले शेणखत,लेंडीखत किंवा कोंबडीखत टाकावे.
• लागवड करताना बियाणे 1 ते 2 से.मी खोलीवर पेरावे तसेच बियाणे जमिनीत जास्त खोलवर
जाणार नाही याची काळजी घ्यावी.
• पाण्याच्या उपलब्धतेनुसार पेरणी सरी किंव्हा वाफ्यामध्ये करावी.
• लागवडीनंतर पंधरा ते वीस दिवसात चांगली उगवण क्षमता दिसते.
• हेक्टरी २० किलो नत्र, ५० किलो स्फुरद व २० किलो पालाशची मात्रा देणे गरजेचे असते.
• दशरथ घासाची पहिली कापणी ७० ते ७५ दिवसांनी करावी. बाकीच्या कापण्या दरमहा कराव्यात.
• हिवाळ्यात थंडीमुळे दशरथ घासाची वाढ कमी वेगाने होते.
• दशरथ घासापासून चार ते पाच कापण्याद्वारे हेक्टरी उत्पादन- ५५० ते ६०० क्विंटल मिळते.
• दशरथघास आपण शेळ्यांना कुट्टी करूनही देऊ शकतो जेणेकरून काड्या शिल्लक राहत नाहीत.
• या चाऱ्यापासून आपण बियाण्यांचे उत्पादन चांगल्या प्रकारे घेऊ शकतो.
• हिरव्या चाऱ्यामध्ये १८ ते २१ टक्के प्रथिने, ९% स्निग्ध पदार्थ,१.९ % खनिजे व ३७.७% कर्बोदके
असतात.

• घासामध्ये पौष्टिक मूल्य जास्त असल्याने शेळ्यांच्या तब्येती चांगल्या राहतात व दूध उत्पादन
क्षमतेत वाढ होते तसेच शेळ्यांच्या अंगावर चांगली चमक दिसून येते विशेषतः शेळ्या आजारी
पडण्याचे प्रमाण कमी होते.

टीप- पशुपालकांनो!! दुग्धव्यवसायातील डिजिटल तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी आजच प्ले स्टोर वरून
Dhenoo App डाऊनलोड करा आणि आपला दुग्धव्यवसाय दुपटीने वाढवा…

लेखक-
नितीन रा.पिसाळ
प्रकल्प समन्वयक/(डेअरी प्रशिक्षक)
धेनू टेक सोल्युशन्स प्रा.लि भोसरी,पुणे.
मो.बा- 9766678285. ईमेल[email protected]

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues