Take a fresh look at your lifestyle.

Countries with funny laws : मजेदार कायदे असलेले देश…

0

General Knowledge : देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कायदे व नियम हे आवश्यक आहेत. मात्र जगभरात काही देशातील कायदे इतके विचित्र आहेत की, ते ऐकलं तर हसूही येतं. कधी-कधी तर असे कायदे करण्यामागचे प्रयोजनही आपल्याला कळत नाही. असेच काही मजेदार कायदे आज जाणून घेऊयात…

दुबईमध्ये अनेक कडक कायदे आहेत. मात्र येथे रस्त्यावर कार आणताना तिची नंबर प्लेट घाणेरडी असेल तर पोलिस दंड वसूल करतात.

रशियात तर न पुसलेली कार रस्त्यावर आणणे हा गुन्हा असून त्यासाठी दंडाची तरतूद आहे.

दुबईतच सार्वजनिक बीचवर चुंबन घेणे गुन्हा आहे.

कॅनडातील अल्बटी येथे बाजारात शपथ घेणे, मारामाऱ्या करणे अथवा ओरडण्यावर बंदी आहे. असे करताना जर कुणी पकडला गेला तर त्याला 5 हजार रूपये दंड केला जातो.

बोलिवियाच्या ला पाज राज्यात विवाहित महिलेला 1 ग्लासपेक्षा अधिक वाईन कायद्याने पिता येत नाही.

इटलीच्या काप्री बेटावर आवाज करणारे चप्पल, सँडल्स वापरण्यावर बंदी आहे. अर्थात ही बंदी फक्त महिलांसाठी आहे.

अमेरिकेच्या स्टेट ओक्लाहामामध्ये कुत्र्यासमोर वेडेवाकडे चेहरे करून दाखविणे हा अपराध मानला जातो.

ब्रिटनमध्ये गर्भवती महिलांना कुठेही मुत्रविसर्जन करण्याची परवानगी आहे.

इटलीतच इराक्ली शहरात बीचवर वाळूची घरे बांधणे हा अपराध मानला जातो. इटलीच्याच स्टेट एबोलीत कारमध्ये चुंबन घेणे हा अपराध आहे.

अमेरिकेच्या स्टेट अर्कन्सानमध्ये महिन्यातून एकदा पतीला पत्त्नीला मारहाण करण्याची परवानगी आहे.

फ्लेारिडामध्ये रविवारी कुमारी मुलींना स्कायडायव्हींग करण्याची परवानगी नाही. हा नियम मोडला तर तो गुन्हा मानला जातो.

India’s World CEO : गुगल-यूट्यूबसह ‘या’ कंपन्यांमध्ये भारतीय वंशाचे सीईओ

एक भारतीय दर महिन्याला सुमारे 20 GB डेटा वापरतो; वाचा 5G मुळे काय बदल झाले?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues