Take a fresh look at your lifestyle.

कपाशीवरील ‘या’ रोगांचे व्यवस्थापन कराल तर फायद्यात रहाल!

0

जास्त कालावधीचे असणाऱ्या कपाशी पिकासाठी स्वच्छ उबदार व कोरडे हवामान अनुकूल असते. या बियाण्याची उगवण होण्यासाठी १८ ते २० अंश सेल्सिअस तर अधिक वाढ होण्यासाठी २० ते २७ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची आवश्यकता असते. किमान व कमाल तापमान १५ ते ३५ अंश सेल्सीअस व हवेतील आर्द्रता ७५ टक्क्यांपेक्षा कमी असणे आवश्यक असते.

उष्ण दिवस आणि थंड रात्र असे हवामान बोंडे चांगली भरण्यास, उमलण्यास उपयुक्त असे असते. आज आपण कपाशीवरील प्रमुख रोग आणि त्याच्या व्यवस्थापनाविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया…

बुरशीजन्य करपा (अल्टरनेरिया ब्लाईट) : पेरणीपासून साधारणतः ७०-७५ दिसवसांत हा रोग दिसतो. या रोगामुळे पानावर व बोंडावर गोलाकार विटकरी किंवा काळ्या रंगाचे ठिपके येतात. यावर उपाय म्हणजे प्रॉपिकोन्याझोल (५०० मिली) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (१५०० ग्रॅ.) + स्ट्रेप्टोसायक्लीन (६० ग्रॅ.) ५०० लि. पाण्यात मिसळून १०-१५ दिवसाचे अंतराने दोन फवारण्या करा.

जीवाणूजन्य करपा (बॅक्टेरिअल लीफ ब्लाइट) : पेरणीपासून साधारणतः ७५-८० दिवसांत हा रोग दिसतो. या रोगामुळे पानावर गडद विटकरी रंगाचे कोनात्मक ठिपके दिसतात. यावरील उपाय म्हणजे प्रॉपिकोन्याझोल (५०० मिली) किंवा कॉपर ऑक्सिक्लोराईड (१५०० ग्रॅ.) + स्ट्रेप्टोसायक्लीन (६० ग्रॅ.) ५०० लि. पाण्यात मिसळून १०-१५ दिवसाचे अंतराने दोन फवारण्या करा.

मर व मुळकूज (बिल्ट व रुट रॉट) : पिकाच्या उगवणीपासून हा रोग दिसायला सुरु होतो. यामुळे झाड वाळून जाते, मुळे सडतात/कुजतात. यावरील उपाय म्हणजे ३ ग्रॅम प्रति किलोप्रमाणे थायरम किंवा ४ ग्रॅंम प्रति किलो प्रमाणे ट्रायकोडरमाची बीज प्रक्रिया करून रोग प्रतिकारक वाण वापरा.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.