Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

गाई-म्हशीचे चीक; जाणून घ्या फायदे व दुष्परिणाम!

0
Please wait..

गाई-म्हशी विल्यानंतर पहिल्या काही दिवसांत कासेतून येणारा पोषक समृध्द स्त्राव म्हणजे ‘चीक’. हा चीक वासरांसाठी एकप्रकारे संजीवनी असतो. कारण यातुन वासरांना रोगप्रतिकारशक्ती मिळते. हा चीक माणसासाठी देखील फायदेशीर आहे. पण त्याचा योग्य मात्रेत वापर न केल्यास दुष्परीणाम देखील होऊ शकतात.

‘हे’ आहेत चीकामधील पौष्टिक घटक :
• चिकात अनेक प्रकारचे जैविक दृष्टया सक्रिय असे घटक असतात.
• चीकामध्ये पौष्टिक घटक हे सामान्य दुधाच्या तुलनेत जास्त प्रमाणात असतात.
• सामान्य दुधा पेक्षा चार ते पाच पट जास्त प्रथिने असतात.
• उर्जा दिड पटीने जास्त असते.
• कॅल्शियम दुप्पट तर फॉस्फरस दिड पटीने जास्त असते.
• जीवनसत्व ‘अ’ १० पट, जिवनसत्व ‘ई’ ६ पट, तर जिवनसत्व ‘डी’ दुप्पट प्रमाणात असतात. या व्यतिरिक्त ‘सी’ आणि ‘बी’ जीवनसत्व देखील चांगल्या प्रमाणात असते.
• ईम्युनोग्लोबूलिन (विशेषत: ‘जि’ आणि ‘ए’) शंभर पटीने जास्त असतात.
• दुधातील सामान्य घटक लॅक्टोज (साखर) योग्य प्रमाणात असते.

वासरांसाठी पहिला चीक ‘संजीवनी’ : वासराचा जन्म झाला कि, ते उभे राहून चीक पिण्याचा प्रयत्न करते. जन्मल्या नंतर दोन तासाच्या चीक आत पाजवणे गरजेचे असते. कारण या काळात चीकातील संरक्षकतत्वे लवकर आणि जास्तीत-जास्त शोषली जातात. अनेकदा काही वासरं जन्मत: कमजोर असल्याने स्वत:हून चीक पिऊ शकत नाही. अशांना चीक काढून लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या निप्पल-बॉटलचा वापर करून पाजा. सुरूवातीच्या काही दिवस चीक हा वासराच्या वजनाच्या दहा टक्के (१०%) इतकाच पाजा. तसेच त्या चीकाचे विभाजन ३ ते ४ भागात करा व वासरांना पाजा.

वासराला चीक पाजण्याचे काय फायदे होतात? :

• वासरू जन्मल्यानंतर चीक हे सुरूवातीच्या काळात एकमेव पौष्टीक आहार आहे. जे नवजात वासराला जास्त प्रमाणात उर्जा व रोग प्रतिकार शक्ती देत असते.
• वासरांना कोणत्याही घातक रोगाच्या विरूध्द रोग प्रतिकार शक्ती वाढवण्याकरिता चीक महत्वाचा आहे.
• चिकाने पोटात पचनासाठी आवश्यक जिवाणूंची संख्या वाढवुन पचनक्रिया सक्रिय होते.
• योग्य प्रमाणात चीक पिलेल्या वासरात चांगली वाढ दिसून येते व वजन हे जलद वाढते.

अतिरिक्त चीकाचे संरक्षण करा : वासराला पुरेसा चीक पाजवून काही प्रमाणात शिल्ल्क राहतो. या चिकाचे योग्य प्रकारे संरक्षण करता येते. हे कमी तापमानावर रेफ्रिजरेटर (फ्रिज) मध्ये साठवून ठेवता येतो. गरजेनूसार बाहेर काढून अर्धा ते एक तास ठेवून पुन्हा वापराता येतो. याने चीकाच्या पौष्टीक घटकात कमी प्रमाणातच बदल होतो आणि चीक पून्हा वापरायला चांगला देखील असतो.

चीक पाजवण्याबदद्लचे गैरसमज जाणून घ्या :-

• पहिल्या चीकाचे सेवन वासरास किंवा माणसास हानिकारक असते.
• झार/ वार बाहेर पडल्यानंतरच वासराला चीक पाजावे. अन्यथा दुष्परिणामकारक ठरते.
• चीक अतिरिक्त असल्यामुळे दुसऱ्या गाई-म्हशीला जेवढे जास्त पाजता येईल तेवढे जास्त पाजा.
• वासराचे पोट खराब होतात आणि हगवण लागते.

तर होईल विषबाधा :

• वरील काही गैरसमजुतीमुळे विलेल्या जनावरांना किंवा अतिरिक्त चीकाचे प्रमाण असल्यामुळे, गाई-म्हशीला जास्त प्रमाणात चीक पाजल्याने विषबाधा होते.
• साधारणत: गाई-म्हशीच्या पोटात प्रथिनांच्या पचनामुळे अमोनिया वायू तयार होतो. परंतू चिकाच्या अति सेवनाने व त्यातील जास्त प्रथिनांमूळे अमोनिया वायूची पोटात मोठ्या प्रमाणात वाढ होते.
• अमोनिया मेंदूच्या कार्यासाठी हानीकारक आहे. म्हणून अशा जनावरांच्या मेंदूवर परिणाम होऊन झटके यायला सुरूवात होते आणि शेवटच्या टप्यात जनावर दगावण्याची शक्यताअसते.
• चिक लहान वासरांसाठी अमृत असला तरी मोठया जनावरांसाठी ते विषआहे. म्हणून जास्तीचा चीक गायी-म्हशी, शेळ्यांना पाजू नका.

विषबाधेचे लक्षणे काय? :

• चारा खाणे कमी होणे किंवा बंद होणे.
• अल्कली धर्मीयअपचण होऊन पोट गच्च होणे.
• रवंथ न करणे.
• अल्कली धर्मीय अपचन.
• पोटाला पाय मारून घेणे
• शेण कमी प्रमाणात व पातळ टाकणे.
• झटके येणे.

वरील सर्व विचार करता गाई किंवा म्हशीना चीक पाजवू नये. तसेच पाजल्यानंतर वरील काही लक्षणे दिसल्यास त्वरीत पशुवैद्यकाशी संपर्क साधावा. घरगुती उपचार करण्याच्या नादात पडू नये.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews