Take a fresh look at your lifestyle.

ट्रॅक्टर खरेदीवर मिळेल मोठी सबसिडी; असा घ्या फायदा!

0

शेतातील कामे करायची म्हटले कि, ट्रॅक्टर अतिशय कमी येतो. मात्र सध्या आपल्याकडे असे अनेक शेतकरी आहेत, ज्यांच्याकडे आर्थिक अडचणींमुळे ट्रॅक्टर नाही. मग त्यांना भाडोत्री ट्रॅक्टरची मदत घ्यावे लागते.

खास अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने एक योजना सुरु केली आहे. त्याअंतर्गत शेतकऱ्यांना मदत करण्याच्या हेतूने ट्रॅक्टरच्या खरेदीवर मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जाते. या योजनेचे नाव आहे पंतप्रधान किसान ट्रॅक्टर योजना.

किती अनुदान मिळते? : केंद्र सरकार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान देत आहे. योजनेतील सर्वात चांगली बाब म्हणजे शेतकरी कुठल्याही कंपनीचे ट्रॅक्टर खरेदी करू शकतात व ते देखील अर्ध्याच किमतीत. उर्वरित अर्धे पैसे अनुदान म्हणून सरकार देणार आहे.

असा घ्या योजनेचा लाभ :
● या योजेते एका शेतकऱ्यास 1 ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान मिळते.
● यासाठी आवश्यक बाबी म्हणजे शेतकऱ्याचे आधार कार्ड, जमीनीची कागदपत्रे, बँकेचा तपशील, पासपोर्ट आकाराचा फोटो.
● योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कुठल्याही सीएससी (CSC) आपले सरकार केंद्रास भेट द्यावी. तेथून ऑनलाईन अर्ज करावा.

———————————————————–

अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

———————————————————–

Leave A Reply

Your email address will not be published.