Take a fresh look at your lifestyle.

कलावंतांच्या मानधनाबाबत मोठा निर्णय, वाचा मोठी बातमी..

0

राज्यात लोककलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. लोक कलावंतांच्या समस्यांबाबत सर्वंकष निर्णय घेण्यासाठी समिती नेमण्यात आली असून त्याचा अहवाल विभागास नुकताच प्राप्त झाला आहे. या अहवालातील निष्कर्ष तपासून मानधन देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

प्रत्येक जिल्ह्यात या अहवालातील निष्कर्ष तपासून जपली जात असलेली कला आणि कलावंत यांची तर्कावर आधारित संख्या विचारत घेऊन मानधन देण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानपरिषदेत सांगितले आहे.

मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले की, राज्यात कलावंतांना अ गटासाठी 3150 रूपये, ब गटासाठी 2700 रूपये तर क गटासाठी 2250 रूपये इतका सन्मान निधी देण्यात येतो. इतर राज्यांपेक्षा हा निधी जास्त आहे. तथापि याबाबत आणखी वाढ करता येईल, का याबाबत अहवालातील निष्कर्ष तपासून निर्णय घेण्यात येणार आहे.

कलावंतांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीलाही सन्मान निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या विविध निवृत्ती वेतन योजनांसाठी वय मर्यादा 60 वर्षांहून अधिक आहे. तथापि राज्यात कलावंतांसाठी ही मर्यादा 50 वर्ष ठेवण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. कलावंतांची सविस्तर माहिती एकत्रित असावी यासाठी पोर्टल तयार करण्यात येत असून निवृत्तीच्या वेळी याचा उपयोग होईल. कलावंतांचे जानेवारी 2023 पर्यंतचे अनुदान वितरित करण्यात आले असेही मुनगंटीवार यांनी सांगितले आहे.

Biofertilizers : शेतकऱ्यांनो जाणून घ्या, जीवाणू खतांचे प्रकार आणि वापरताना घ्यावयाची काळजी

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues