Take a fresh look at your lifestyle.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana राज्य सरकारच्या ‘या’ योजनेमध्ये शेतकऱ्यांना मिळते 100% अनुदान; जाणून घ्या संपूर्ण प्रोसेस

0

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana राज्यातील अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड करतात. फळबाग लागवड ही संकल्पना त्या शेतकऱ्यांना वरदान ठरली, ज्यांच्या जमिनी मागील काही वर्षांपासून पडीक होत्या. राज्य सरकारकडून 1990 नंतर आलेल्या अनेक महत्वकांक्षी योजनांमुळे फळबाग संकल्पना ग्रामीण भागातील तसचे निमशहरी भागातील शेतकऱ्यांना मनावर रुजनारी ठरली. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात आता पर्यंत 18 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्रावर फळबागा उभ्या आहेत. परंतु अद्याप फळबाग लागवडीमध्ये अपेक्षित असे यश मिळालेले नाही. म्हणूनच आज आम्ही आपल्याला एक 100% अनुदान देणाऱ्या एका जबरदस्त योजनेविषयी सांगणार आहोत.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली असून या योजनेची सुरुवात 2018-19 पासून महाराष्ट्र राज्यात भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) नावाने ओळखली जाते. ही योजना राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे. हि योजना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जे शेतकरी फळबाग लागवडीकरिता पात्र ठरू शकत नाहीत, अशा शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने नवीन राज्य पुरस्कृत फळबाग लागवड योजना मंजूर करण्याचा निर्णय दि. 20 जून 2018 रोजीच्या मंत्रीमंडळ बैठकीत घेतला होता.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी 50%, दुसऱ्या वर्षी 30% आणि तिसऱ्या वर्षी 20% अश्या तीन वर्षात देण्यात येते. लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती झाडांसाठी 90% तर कोरडवाहू झाडांसाठी 80% ठेवणे आवश्यक आहे. या योजनेच्या माध्यमातून पीक व पशुधन याबरोबरच फळबागेच्या रूपाने शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत उपलब्ध करून देणे. योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यास व उत्पन्न दुप्पट करण्यास मदत करणे, असे उद्दिष्ट आहे.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana या योजनेसाठी हे शेतकरी पात्र ठरतील :
▪️ लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच शेतात बसवणे बसविणे अनिवार्य आहे.
▪️ लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येईल. संस्थात्मक शेतकर्‍यांना कोणताही लाभ मिळणार नाही.
▪️ शेतकऱ्याचा स्वतःच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे.
▪️ संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.
७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.
▪️ परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.
▪️ इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana या योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
▪️ ७/१२ व 8-अ उतारा
▪️ हमीपत्र
▪️ संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र
▪️ जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमातीशेतकऱ्यांसाठी)

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट : https://mahadbtmahait.gov.in/Farmer/SchemeData/SchemeData?str=E9DDFA703C38E51AD8FABF0B538FA508

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues