Take a fresh look at your lifestyle.

Bamboo Farming आता ‘ही’ शेती करून तुम्हीही कमाऊ शकता दरवर्षी लाखो रुपये Krushidoot

0

Bamboo Farming भारतासारख्या कृषिप्रधान देशातील अनेक भागांत मागील काही वर्षांपासून शेतीचा फारसा विकास झाला नसल्याचे दिसून आले आहे. सध्याच्या काळात तर उत्पादन खर्च वाढल्याने शेती परवडत नसल्याची ओरड शेतकऱ्यांकडून नेहमीच केली जाते. मात्र, आता पारंपरिक शेतीला टाटा, बाय बाय करण्याची वेळ आल्याचे शेती अभ्यासक सांगत आहे.

Bamboo Farming कारण सध्या अनेक शेतकरी आपल्या शेतीतून भरघोस कमाई करण्याचा प्रयत्न करत असून कमी खर्चात जास्त नफा कसा होण्याची याचे नियोजन करत आहेत. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला आज अश्या शेती बाबत सांगणार आहोत जी शेती तुम्ही अगदी कमी कष्टात, कमी पाण्यावर, कमी भांडवलात आणि तेही अगदी खडकाळ, डोंगराळ जमिनीतून देखील दरवर्षी लाखोंचे उत्पन्न करून देऊ शकते. विशेष म्हणजे, या पिकासाठी सरकारही तुम्हाला मदतीचा हात देत आहे. हे पीक म्हणजे, अर्थातच बांबू लागवड..!

Bamboo Farming हे शेती अगदी नापीक व निरुपयोगी जमिनीत देखील लागवड करता येत असून, त्यातून शेतकऱ्याला या माध्यमातून दरवर्षी मोठी कमाई करता येऊ शकते. एकदा बांबू लागवड केली, तर अगदी 40 वर्षे काहीही न करता देखील तुम्ही कमाई करू शकता. एवढेच नव्हे तर बांबू लागवडीसाठी मध्य प्रदेशमध्ये तर शेतकऱ्यांना 50 टक्के अनुदान दिले जाते.

महागाईचा झटका! सीएनजी आणि पीएनजीच्या दरात पुन्हा वाढ

Bamboo Farming बांबूची शेती कशी करावी..?
बांबूची शेती हे कोणत्या एका हंगामातील पीक नाही. त्यामुळे या शेतीला बराच वेळ द्यावा लागतो. बांबू तयार व्हायला सुमारे 4 वर्षे लागतात. तर चौथ्या वर्षी त्याची कापणी करता येते. साधारणपणे यासाठी 3 बाय 2.5 मीटरवर बांबूचे एक रोप लावलं जातं. त्यातून सुमारे एक हेक्टरवर 1500 रोपे लावली जातील. दोन रोपांमधील मोकळ्या जागेत तुम्ही आंतरपीकही घेऊ शकता. तर दर 4 वर्षांनंतर बांबूची कापणी केले जाते. त्यातून अनेक शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांची कमाई करतात.

Bamboo Farming हि शेती करताना हि गोष्ट नेहमी ठेवा लक्षात :

सध्या भारतात बांबूच्या 136 प्रजाती असून त्यामुळे बांबू शेती करण्यापूर्वी त्याच्या वाणांची माहिती असायला हवी. आपल्याला कोणत्या प्रकारचे बांबू लावायचे आहेत, आपण बाजारात ते कसे विकणार आहोत, याबाबत आधीच नियोजन करा..

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues