Take a fresh look at your lifestyle.

कौतुकास्पद : मुलीने शिकण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 48 तासात पालटवले कुटुंबाचं नशीब

0

मागील काही दिवसांपासूनची संपूर्ण देशातील राजकीय परिस्थिती पाहता सर्व सामान्य जनतेचा अक्षरशः राजकारणावरून विश्वास उडाला आहे. अनेक जण तर आता राजकारणाविषयी बोलणे देखील टाळायला लागले आहेत. परंतु आज देखील काही लोकनेते सोडल्यास उर्वरित सर्व राजकारणी आजही खरोखरच जनतेसाठी अत्यंत चांगले काम करतात. त्याचेच एक उदाहरण म्हणजे झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन. हेमंत सोरेन सध्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सर्वाधिक चर्चात आहेत, त्याचे कारण देखील काही वेगळेच आहे..

झारखंड मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची एवढी चर्चा का?

मिळालेल्या माहितीनुसार, झारखंडमध्ये आयोजित करण्यात आलेल्या लोकसंवाद कार्यक्रमात एक मुलीने मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडली. बेबी कुमारी असं या मुलीचं नाव असून तिने मुख्यमंत्र्यांसमोर आपल्याला शिकण्याची इच्छा असून मदत करण्याची विनंती केली. यानंतर अवघ्या 48 तासात मुख्यमंत्री कार्यालयाकडून त्या विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबाला अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यात आला.

बेबी कुमारी नामक विद्यार्थिनीला सरकारी मदत देण्यात आली असून तिला सावित्रीबाई फुले योजनेंतर्गत मदत करण्यात आला आहे. तर तिच्या बहिणींना देखील शिष्यवृत्ती देण्यात आली आहे. तसंत तिच्या आईला बकरी पाळण्यासाठी मुख्यमंत्री पशुधन विकास योजनेशी जोडण्यात आलं आहे. एवढेच नव्हे तर बेबी कुमारीचे वडील इंद्रेश राम यांना मुख्यमंत्री रोजगार हमी योजनेंतर्गत पाच लाख रुपये देखील देण्यात आले आहेत. या मदतीनंतर मुख्यमंत्र्यांनीही ट्वीट करत ‘हा भाऊ तुझ्यासोबत आहे, तू खूप शिक’ असं म्हणत तिला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, यासर्व मदतीमुळे अवघ्या 48 तासात या मुलीचे व तिच्या सर्व कुटूंबाचे नशीब बदलले.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues