Take a fresh look at your lifestyle.

Rain in winter : ऐन हिवाळ्यात पाऊस पडण्यामागील नेमकं कारण काय?

0

Rain in winter गेल्या वर्षभरापासून वातावरणातील बदलाने शेतकऱ्यासह, सर्वसामान्यांना हैराण करून सोडले आहे. कडक्याचा उन्हाळा, लांबलेला पावसाळा, आणि हाड गोठवणारी थंडीचा अनुभव लोकांनी घेतला आहे. गेल्या काही दिवसांचा राज्यातील हवामानात मोठा बदल पाहायला मिळत आहे. सध्या संपूर्ण राज्यात ढगाळ वातावरणाचे चित्र आहे. महाराष्ट्रातील विविध भागामध्ये काही ठिकाणी हलका पाऊस झाल्याचे बघायला मिळाले. त्यामुळे कडाक्याची पडलेली थंडी अचानक कमी होऊ पाऊस झाल्याने वातावरणात मोठा बदल झाल्याचे जाणवू लागले आहे.

Rain in winter अचानक थंडीही कमी झाली आहे. मात्र, अचानक झालेला हा बदल नेमका कशामुळे झाला? असा प्रश्न डोके वर काढत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने हे ढगाळ वातावरण असून दक्षिणेकडील राज्यांत आगामी तीन ते चार दिवसांत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

Rain in winter मात्र राज्यातील वातावरणात झालेल्या बदलामुळे शेतीकरी वर्ग पुरता धास्तावला आहे. विशेषतः द्राक्ष उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने दक्षिणेकंदील राज्यांना धोका आहे, सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाले असून मुसळधार पाऊसाची शक्यता आहे.

महत्वाच्या बातम्या : राज्यात लवकरच 3110 तलाठी पदांसाठी भरती होणार, शासन निर्णय जाहीर

थंडीचा महिना सुरू असतांना अचानक झालेला हा बदल शेतकरीवर्गाची चिंता वाढविणारा आहे. त्यातच मुसळधार पाऊस सांगितल्याने पुन्हा संकट ओढवण्याची शक्यता असल्याने आर्थिक मोठा बसण्याची चिन्हे आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues