Covid Guidelines : देशात पुन्हा मास्क सक्ती लागू होणार कि नाही? केंद्र सरकारने सर्व राज्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
Covid Guidelines चीन सह जगातील अनेक देशातील कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या धडकी भरवणारी आहे. चीनशिवाय इतर काही देशांमध्येही कोरोना रुग्णांमध्ये दिवसंदिवस वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून भारत सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.
Covid Guidelines काल भारतातील कोविड परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आणि जैवतंत्रज्ञान विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते. याच प्राश्वभूमीवर देशात पुन्हा मास्क लावले लागेल कि नाही?; याबाबत केंद्र सरकारनं राज्यांना काही महत्त्वाच्या सूचना केला आहेत…
Covid Guidelines काय सूचना केल्या आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांना :
▪️ गर्दीच्या ठिकाणी मास्क लावणे
▪️ ज्येष्ठ नागरिकांनी बूस्टर डोस घ्या
▪️ आजार असलेल्या लोकांनीही बूस्टर डोस घ्या
▪️ शाळा, कॉलेजेस, विद्यापीठं अलर्टवर
▪️ अधिका-यांना सतर्कतेचे आदेश
▪️ न्युमोनियाच्या रुग्णांची योग्य तपासणी करा
▪️ लक्षण असल्यास कोरोना टेस्ट करा
दरम्यान, देशात सध्या कोरोनाचे 3400 च्या असापास उपचाराधीन रुग्ण आहेत. देशात कोरोनाची रुग्णसंख्या कमी असली तरी चीनसह अन्य देशांत मोठी रुग्णवाढ नोंदविण्यात येत आहे.
मोठी बातमी : देशात पुन्हा कोरोनाची कडक गाईडलाईन्स व मास्क सक्ती होण्याची शक्यता!!