Take a fresh look at your lifestyle.

Amit Shah ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार मोठा दिलासा; सहकार मंत्री अमित शहांनी केली मोठी घोषणा

0

Amit Shah भारतात शेतीला चालना देण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार नेहमीच काहींना काही योजना ह्या सर्वसामान्य शेतकऱ्यांनसाठी राबवत असतात. असे असताना देखील शेतकऱ्यांना याचा फायदा खूप कमी प्रमाणात मिळतो. तर अनेक शेतकरी सरकारच्या योजनापासून वंचीत राहतात. यामुळेच आता केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी एक मोठा निर्णय घेतला असून शहायांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे एका कार्यक्रमात बोलताना ही माहिती दिली.

Amit Shah सहकारमंत्री अमित शहा म्हणाले कि, आता लवकरच सहकारी बँकेच्या ग्राहकांना (Cooperative banks customer) सरकारच्या सर्व कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार असून यासाठी सहकारी बँकांना डायरेक्ट बँक ट्रान्सफरशी (DBT) जोडले जाणार आहे. तसचे सध्या सरकारच्या 52 मंत्रालयांमार्फत चालवल्या जाणाऱ्या 300 योजनांचा लाभ डीबीटीद्वारे लाभार्थ्यांपर्यंत पोचवला जातो आहे. म्हणजेच आता या सर्व योजनांचा लाभ सहकारी बँकांच्या ग्राहकांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

Amit Shah पुढे बोलताना ते म्हणाले कि, बँकिंग क्षेत्रात आता पूर्वीपेक्षा खूप सुधारणा झाली आहे. त्यामुळे देशातील नागरिकांना बँकिंग सेवेचा लाभ मिळत आहे. याशिवाय जन धन योजनेमुळे 45 कोटी नवीन लोकांचे बँक खातेही उघडण्यात आले आहे. यातील 32 कोटी लोकांना रुपे डेबिट कार्डचा लाभ मिळणार असायचे सहकारमंत्री म्हणाले.

Amit Shah दरम्यान, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या या निर्णयाचा सहकारी बँकांच्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.