Take a fresh look at your lifestyle.

Black Wheat Cultivation या पद्धतीने काळ्या गव्हाची शेती करून तुम्ही कमाऊ शकता बक्कळ पैसा!!

0

Black Wheat Cultivation निसर्गाची साथ मिळाली आणि पीक चांगलं आलं तरी त्या पिकाला बाजारात चांगला भाव मिळेलच याची शाश्वती कधी नसते. पण परंपरागत शेती करताना नवे प्रयोग केले तर याचा निश्चितच फायदा होऊ शकतो. काळे गहू (Black Wheat) हे त्यापैकी एक उत्तम उदाहरण म्हणता येईल.

Black Wheat Cultivation भारतात उत्पादित होणारी मुख्य पीक म्हणजे अर्थातच गहू, सध्या पाहता गव्हामध्ये अनेक बदल होत आहेत. हा बदल सकारात्मक दिशा घेत असला आहे. तर सध्या साधारण गव्हापेक्षा काळ्या गव्हाला बाजारात तब्बल चौपट भाव मिळत असल्याने याकडे उत्तम पर्याय म्हणून पाहिलं जाऊ शकतं. या नफ्यामुळे देशातील शेतकऱ्यांचा कल काळ्या गव्हाकडे वाढला आहे. तर सामान्य गव्हापेक्षा हा गहू खूप वेगळा असून या गव्हात अँथोसायनिन रंगद्रव्य जास्त असते. यामुळे तो काळा दिसतो. तसचे पांढऱ्या गव्हात अँथोसायनिनचे प्रमाण 5 ते 15 पीपीएम असते तर काळ्या गव्हात 40 ते 140 पीपीएम असते.

Black Wheat Cultivation काळ्या गव्हाचे फायदे काय?
काळ्या गव्हामध्ये अनेक पौष्टिक घटक आढळतात. त्यामुळे त्याचे शरीराला अनेक फायदेही मिळतात. त्यात लोहाचे प्रमाण खूप जास्त असते. कर्करोग, रक्तदाब, लठ्ठपणा आणि साखरेच्या रुग्णांसाठी वरदान मानले जाते. याशिवाय हा गहू खाल्ल्याने रक्ताची कमतरता भासत नाही आणि दृष्टीही वाढते.

Black Wheat Cultivation तब्बल 8 हजार रुपये क्विंटल दर :
खरं तर, काळ्या गव्हाच्या लागवडीसाठी जास्त खर्च येतो. तर महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या उत्पादनातून प्रचंड नफा मिळू शकतो. बाजारात काळा गहू 7000-8000 रुपये प्रति क्विंटल दराने विकला जातो. तर सामान्य गव्हाची किंमत हि केवळ 2,000 ते 2200 रुपये प्रति क्विंटल आहे.

Black Wheat Cultivation कधी केली जाते काळ्या गव्हाची लागवड?
साधारण पणे काळ्या गव्हाची लागवड हि रब्बी हंगामात केली जाते. नोव्हेंबर महिना हा पेरणीसाठी चांगला मानला जातो. तर काळ्या गव्हासाठी ओलावा हा खूप महत्वाचा आहे. मात्र नोव्हेंबरनंतर काळ्या गव्हाची पेरणी केल्यास उत्पादनात मोठी घट होते.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues