19 देशांचे 177 उपग्रह प्रक्षेपित करत इस्रोची मागील पाच वर्षात केली बक्कळ कमाई
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजे इस्रो (ISRO) ही जगात अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील एक आघाडीची व नामांकित संस्था म्हणून ओळखली जातो. यांचा इस्रोने अंतराळ संशोधनात आता एक वेगळा ठसा उमटवला आहे. कारण इस्रोने आपल्या व्यावसायिक शाखेद्वारे गेल्या पाच वर्षांत 19 देशांचे 177 परदेशी उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित केले असल्याची माहिती केंद्रीय अणुऊर्जा आणि अंतराळ राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्रो जानेवारी 2018 ते नोव्हेंबर 2022 या पाच वर्षात 19 देशांचे आणि त्यांमधील विविध संस्थांचे तब्बल 177 उपग्रह प्रक्षेपित केले आहेत. यामधून इस्रोने 94 दशलक्ष डॉलर आणि 46 दशलक्ष युरो एवढे उत्पन्न मिळाले असून भारतीय रुपयात इस्रोने एकुण एक हजार 100 कोटीची बक्कळ कमाई केली आहे.
इस्रोने मागील पाच वर्षात कोणत्या देशाचे उपग्रहांचं केले प्रक्षेपण :
इस्रोने मागील पाच वर्षात ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, कोलंबिया, फिनलंड, फ्रान्स, इस्रायल, इटली, जपान, लिथुआनिया, लक्झेंबर्ग, मलेशिया, नेदरलँड, दक्षिण कोरिया, सिंगापूर, स्पेन, स्वित्झर्लंड, ब्रिटन आणि युनायटेड स्टेट्स या देशाचे उपग्रहांचं प्रक्षेपण केले आहे.
हेही वाचा : सर्वात महागडा चित्रपट अवतार-2 ची कथा कशी सुचली?