Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

एका युक्तीची कमाल अन् शेतकरी झाला मालामाल; 6 एकरात घेतली 32 पिके

0

अनेकदा शक्ती पेक्षा युक्ती श्रेष्ठ असे म्हटले जाते. अगदी याचीच प्रचिती एका शेतकऱ्याला आली आहे. कारण त्याने लढवलेल्या युक्तीने त्याला लखपती बनवले आहे. नक्की कोण आहे हा शेतकरी? त्याची यशोगाथा आहे तरी काय? शेतीच्या जीवावर शेतकरी लखपती कसा बनला आहे? अगदी सविस्तर जाणून घेऊयात…

ही यशोगाथा आहे अकोले जिल्ह्याच्या पातुर तालुक्यात असणाऱ्या दिग्रस गावची. शेतकऱ्यांचं आहे नाव राजेंद्र ताले. विशेष म्हणजे त्यांचं शिक्षण अगदी जेमतेम नववी झालेलं आहे. एक जबरदस्त युक्ती लढवून ते लखपती झाले. त्यांना सहा एकरात 32 प्रकारचे पिके घेतली. ज्यात भाजीपाला, फळबाग, औषधी वनस्पती अशी विविध प्रकारची 32 शेती पिके घेतली, यातून भरघोस उत्पन्न कमावलं. खऱ्या अर्थाने पारंपारिक शेतीला फाटा देत शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीचा मार्ग निवडून शेतीतून भरमसाठ उत्पन्न कमावले.

शेतीत विविध प्रयोग केल्याने ताले यांच्यासाठी लखपती होण्याचा राजमार्ग खुला झाला. विशेषतः सेंद्रिय खतांचा वापर करून त्यांना जे काही प्रयोग करता येतील ते ताले यांनी केले. तसेच प्रत्येक पिकाच्या विविध जातींची लागवड करून त्यांची विक्री केली. अशा पद्धतीने शेती करत त्यांना वर्षाकाठी 9 ते 10 लाख रुपये केवळ नफा कमावला. यासाठी त्यांनी कधी कर्जही घेतलं नाही आणि कोणत्या अनुदानासाठी अर्जही केला नाही. त्यामुळे त्याचे यश इतर शेतकऱ्यांनी आदर्श असेच आहे.

हेही वाचा : आता सरकार मिटवणार जमिनीवरून होणारे भाऊबंदकीतील वाद; ‘ही’ सरकारी योजना करेल यासाठी मदत

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews