Take a fresh look at your lifestyle.

Jan Dhan Yojna : जनधन खातेधारकांची चांदी! खात्यावर येणार ‘इतके’ पैसे जाणून घेऊया krushidoot

0

केंद्र सरकारने (Central Government) आपल्या पहिल्या कार्यकाळात जन धन योजनेंतर्गत (Jan Dhan Yojna ) गरिबांची खाती उघडली होती, ज्यामध्ये लोकांनी भरपूर सहभाग घेतला होता. सरकार जनधन खात्यात काही रक्कम जमा करेल, अशी आशा सर्वांना होती, पण काही वर्षे झाले नाही. आता मात्र केंद्र सरकार जनधन खातेदारांवर मेहरबान झाली आहे, अशा (Jan Dhan Yojna ) जन धन खातेधारकांसाठी आपली तिजोरीची पेटी उघडली आहे.

(Jan Dhan Yojna ) जर तुमचे देखील जन धन खाते उघडले असेल तर आता तुमची चांदी होणार आहे. कारण आता थोडे पैसे खर्च करून तुम्हाला मोठा फायदा होणार आहे. केंद्र सरकारने जनधन खातेधारकांसाठी अशी योजना सुरू केली आहे, ज्याअंतर्गत पेन्शन दिली जाणार आहे. सरकारने सुरू केलेली योजना पीएम श्रम योगी मानधन योजना PM Shram Yogi mandhan Yojna आहे, ज्या अंतर्गत दरमहा 3,000 रुपये पेन्शन दिले जाईल. या योजनेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

(Jan Dhan Yojna ) वर्षाला अनेक हजार रुपये येतील खात्यात :
पीएम श्रम योगी मानधन योजना, PM Shram Yogi mandhan Yojna सरकारने सुरू केलेली योजना, ज्या अंतर्गत दर महिन्याला 3,000 रुपये पेन्शन दिले जाईल. त्यानुसार वर्षाला 36,000 रुपये खात्यात ट्रान्सफर केले जातील. त्याचा लाभ फक्त जनधन खातेधारकांनाच मिळेल, ज्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्याच वेळी, 18 वर्षे ते 40 वर्षे कोणतीही व्यक्ती सहभागी होऊ शकते, जेव्हा एखादी व्यक्ती 60 वर्षांची होईल, तेव्हा या योजनेचे पैसे त्याच्याकडे हस्तांतरित केले जातात.

Jan Dhan Yojna या लोकांना फायदा होईल.
असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पीएम श्रम योगी मानधन योजनेचा PM Shram Yogi mandhan Yojna लाभ मिळतो. पथ विक्रेते, मध्यान्ह भोजन कामगार, हेड लोडर, वीटभट्टी कामगार, मोची, चिंध्या वेचणारे, घरगुती कामगार, धोबी, रिक्षाचालक, भूमिहीन मजूर या योजनेचा लाभ घेऊ शकतील. याशिवाय, जर मासिक उत्पन्न 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल तरच तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता.

महत्वाच्या बातम्या :

मुलींच्या सुरक्षित आर्थिक भवितव्यासाठी ही योजना खूपच लाभदायी! दररोज 416 रुपये जमा केल्यास मिळेल 65 लाख रुपयांचा निधी

Loan For Land : जमीन घेण्यासाठी कर्ज घेताय ? तर या महत्वाची माहिती नक्की वाचा

Jan Dhan Yojna दरमहा इतके रुपये जमा करावे लागतील.
PM Shram Yogi mandhan Yojna पीएम श्रम योगी मानधन अंतर्गत, वेगवेगळ्या वयोगटानुसार दर महिन्याला 55 ते 200 रुपये प्रीमियम Premium भरावा लागेल. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात तर तुम्हाला दर महिन्याला 55 रुपये द्यावे लागतील.

30 वर्षांच्या व्यक्तींना 100 रुपये आणि 40 वर्षांच्या व्यक्तींना 200 रुपये भरावे लागतील. या योजनेत नोंदणी करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या बचत बँक खात्याचा किंवा जन धन खात्याचा IFSC कोड आवश्यक असेल. याशिवाय तुमच्याकडे आधार कार्ड आणि वैध मोबाईल नंबर असणे अत्यंत गरजेचे आहे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues