Take a fresh look at your lifestyle.

ड्रोन खरेदीसाठी 4 लाखांचे अनुदान, सरकारचा मदतीचा हात!

0

गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये अनेक नव-नवीन तंत्रे येत आहेत. विशेषतः शेतीला सुलभ करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराला चालना दिली जात आहे. शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीसाठी जास्तीत-जास्त 4 लाख रुपयांचे अनुदानही दिले जात आहे.

आजघडीला देशात लहान आणि सीमांत शेतकऱ्यांची संख्या खूप जास्त आहे. मात्र या शेतकऱ्यांना कृषी यंत्रे खरेदी करणे इतके सोपे नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने अशा शेतकऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे. विशेषतः शेतकरी तांत्रिकदृष्ट्या शेतीत मागे राहू नयेत यासाठी ही मदत देऊ केली जात आहे. कृषी मंत्रालयाकडून सहकारी शेतकरी, एफपीओ आणि ग्रामीण उद्योजकांना कस्टम हायरिंग सेंटरद्वारे ड्रोनच्या मूळ किमतीच्या 40 टक्के किंवा कमाल 4 लाख रुपये पर्यंत आर्थिक मदत उपलब्ध होते.

कोणत्याही पिकावर अचानक रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने फवारणी करणे अशक्य होते, परंतु या ड्रोन तंत्राने एकाच वेळी मोठ्या क्षेत्रावर फवारणी शक्य आहे. त्यामुळे औषध आणि वेळ दोन्हीची बचत होते. यापूर्वी वेळेअभावी शेतकऱ्यांना औषध फवारणी करणे शक्य नव्हते. त्यामुळे पिकांमध्ये किडींचा प्रादुर्भाव व्हायचा आणि पिकांची नासाडी होत असे, मात्र आता ड्रोनच्या सहाय्याने एकाच वेळी अधिक एकरांवर फवारणी करता येईल. त्यामुळे शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने वेळ वाचणार आहे. यासोबतच शेतीचा खर्चही पूर्वीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी होईल. त्याचबरोबर पिकावर योग्य वेळी फवारणी करून त्यावर ड्रोनद्वारे लक्ष ठेवल्याने पिकांवर कोणताही रोग होणार नाही.

हेही वाचा : सोलापुरातील पठ्याने लाल केळीच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग, नक्की कसं मिळालं यश?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues