Take a fresh look at your lifestyle.

100 most powerful women : जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत नक्की कोणाची वर्णी? पाहा यादी!

0

100 most powerful women जगातील 100 शक्तिशाली महिलांच्या यादीत यंदा सहा भारतीय महिलांनी वार्षिक यादीत स्थान मिळवले आहे. त्यात अर्थमंत्री निर्मला सीतारामन, बायोकॉनचे कार्यकारी अध्यक्ष किरण मुझुमदार-शॉ आणि Nykaa संस्थापक फाल्गुनी नायर यांचा समावेश आहे.

100 most powerful women सीतारामन यावेळी 36 व्या क्रमांकावर असून त्यांनी सलग चौथ्यांदा या यादीत स्थान मिळवले आहे. यापूर्वी 2021 मध्ये त्या 37 व्या स्थानावर होत्य . 2020 मध्ये 41व्या आणि 2019 मध्ये 34व्या स्थानावर होत्या. फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीनुसार, मुझुमदार-शॉ या वर्षी 72व्या, तर नायर 89व्या क्रमांकावर आहेत.

100 most powerful women या यादीतील इतर भारतीयांमध्ये एचसीएल टेक चेअरपर्सन रोशनी नादर मल्होत्रा ​​(53व्या क्रमांकावर), सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) च्या अध्यक्षा माधवी पुरी बुच (54व्या क्रमांकावर) आणि स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया (सेल) च्या अध्यक्षा सोमा मंडल (67व्या क्रमांकावर) यांचा समावेश आहे.

मल्होत्रा, मुझुमदार-शॉ आणि नायर यांनी गेल्या वर्षीही या यादीत अनुक्रमे 52वे, 72वे आणि 88वे स्थान मिळवले होते. या यादीत 39 मुख्य कार्यकारी अधिकारी आणि 10 राज्य प्रमुखांचा समावेश आहे. याशिवाय यामध्ये 11 अब्जाधीशांचा समावेश आहे, ज्यांची एकूण संपत्ती 115 अब्ज डॉलर्स आहे.

हेही वाचा : बांगलादेश विरुद्ध टीम इंडियाच्या पराभवाची 4 कारणे, कोण आहे व्हिलन?

फोर्ब्सच्या यादीत नायर यांच्याबद्दल असे म्हटले आहे की 59 वर्षीय व्यावसायिकाने दोन दशके गुंतवणूक बँकर म्हणून काम केले, आयपीओचे नेतृत्व केले आणि इतर उद्योजकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यात मदत केली. फोर्ब्स वेबसाईटनुसार, 41 वर्षीय मल्होत्रा ​​एचसीएल टेकच्या सर्व धोरणात्मक निर्णयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

अशा प्रकारे बुच या सेबीच्या पहिल्या महिला अध्यक्षा आहेत. त्याचप्रमाणे मंडल या सेलच्या प्रमुख असलेल्या पहिल्या महिला आहेत आणि त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून कंपनीने विक्रमी आर्थिक विकास साधला आहे. फोर्ब्सच्या वेबसाईटनुसार, त्यांच्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात कंपनीचा नफा तिपटीने वाढून 120 अब्ज रुपये झाला.

युरोपियन कमिशनच्या अध्यक्षा उर्सुला वॉन डर लेयन जगातील 100 सर्वात शक्तिशाली महिलांच्या यादीत पहिल्या स्थानावर आहेत. युक्रेन युद्धादरम्यानचे नेतृत्व आणि कोविड-19 महामारीचा सामना करण्यासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे त्यांना हे स्थान मिळाले आहे.

युरोपीयन सेंट्रल बँकेच्या अध्यक्षा क्रिस्टीन लागार्डे या यादीत दुसऱ्या, तर अमेरिकेच्या उपाध्यक्ष कमला हॅरिस तिसऱ्या क्रमांकावर आहेत. इराणच्या झिना महसा अमिनी यांना मरणोत्तर प्रभावशाली यादीत 100 वे स्थान मिळाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues