Take a fresh look at your lifestyle.

Wilt of pomegranate : डाळिंबातील मररोगाविषयी कारणे आणि उपाय; वाचा सविस्तर..

0

डाळिंब बागेत झाडे मुखत्वे ३ कारणांमुळे मरतात.
१) मररोग ( Fusarium wilt )
२) सूत्रकृमी ( Nematods)
३) खोडकिडे ( सुरश्या)

आपल्या बागेत नेमकी वरीलपैकी कोणत्या प्रकारामुळे झाडे जातात हेच अनेक शेतकऱयांना कळत नाही. त्यामुळे त्यावर नीट उपाययोजना करता येत नाही. मी असेही काही शेतकरी पाहिले आहेत कि ज्यांच्या बागेत बरेचदा मररोगामुळे झाडे मरतात व शेतकरी सुरश्यासाठी वापरण्यात येणाऱ्या क्लोरो व नुवानाने खोडे धुत बसतात. मररोग हि बुरशी आहे तिला वरील कीटकनाशकांने काहीही परिणाम होत नाही.
तरी आपल्या बागेतील झाडे कोणत्या प्रकाराने जातात यासाठी पुढील लक्षणे तपासावीत.

PM Krishi Udan Yojana : कृषी उडान योजनेचा विस्तार करण्याच्या सरकार तयारीत, 21 अतिरिक्त विमानतळांचा समावेश करण्याची योजना

१) मररोग लक्षणे :
झाडाची एक फांदी पिवळी पडते. त्या फांदीची पाने गळत नाहीत. नंतर पूर्ण फांदी वाळून जाते.
एक फांदी पिवळी पडून नंतर सर्वच झाड वाळून जाते. झाडावरील फळे पण वाळून तडकून जातात.

उपाय :
बहुतेक करून या प्रकाराने बऱ्याच डाळिंब बागेतील झाडे जातात. या साठी, मररोगाने पिवळ्या झालेल्या प्रत्येक झाडासाठी ८-१० लिटर पाणी घेऊन त्यात प्रोपीकोनॅझोल(टिल्ट)- २ मिली प्रति लिटर + क्लोरोपायरीफॉस ५०%(हमला) – ५ मिली हे मिश्रण झाडाच्या खोडाजवळ सर्व बाजूने ओतावे.
हा प्रयोग महिन्यातून दोनदा करावा. तसेच बहार धरताना व प्रत्येक महिन्याला ५०० मिली टिल्ट व १ लिटर हमला प्रति एकर ड्रिपवाटे सोडून द्यावे. मररोग हा बुरशीजन्य रोग आहे त्यामुळे खाली सूत्रकृमी सांगितलेल्या उपाययोजना या रोगासाठी देखील लागू होतील.

सूत्रकृमी (Nematode) :
लक्षणे :

झाडाच्या मुळ्यांवर सूत्रकृमी च्या गाठी दिसतात. झाडांची व फळांची वाढ खुंटली जाते.

उपाय :
सूत्रकृमी कंट्रोल करण्यासाठी अनेक औषध बाजारात उपलब्ध आहे. पण शुद्ध *(निमतेल न काढलेलीे) निंबोळी पेंड* (खत) 1 ते 1.5 कीगॅ/झाड प्रति वर्ष द्यावॆ. प्रादुर्भाव जास्त असल्यास २०० लिटर पाणी च्या एका टाकीमध्ये, ५ लिटर ट्रायकोडर्मा, ५ लिटर ताक, ५ किलो काळा गुळ, ५ लिटर गोमूत्र या प्रमाणात घ्या. वरील मिश्रण एक २ दिवस भिजू द्या. प्रत्येक दिवशी टाकीत एक लाकडी काठी टाकून मिश्रण घड्याळाच्या काट्याच्या दिशेनं हलवावे. दुसऱ्या दिवशी या टाकीतील १८० लिटर पाणी ड्रीपवाटे बागेला सोडा व २० लिटर तसेच टाकीत ठेवा. या राहिलेल्या २० लिटर पाण्यात पाणी व गूळ गोमूत्र ताक वरील प्रमाणात परत टाका. ट्रायकोडर्मा परत टाकण्याची गरज नाही. परत १८० लिटर ड्रिपवाटे सोडून द्या व २० लिटर परत बाकी ठेवा. व शेवटच्या वेळी पूर्ण २०० लिटर स्लरी सोडून द्या. असा प्रयोग केल्याने निम्याटोड १००% कंट्रोल होईल.

३) खोडकिडा ( सुरश्या )
लक्षणे :

बऱ्याचदा खोडकिडा व मररोग यामध्ये शेतकऱ्यांची गल्लत होते. खोडकिडा असेल तर झाडाच्या खोडावर टाचणीने टोचल्याइतके बारीक छिद्रे असतात व या छिद्रांतून खोडाची पावडर बाहेर पडते.
खोडाला घेरू चोळलेला असेल तर खोडकिड्याला थोडा प्रतिबंध मिळतो व खोडातून पडलेली पावडर स्पष्टपणे दिसल्यामुळे वेळीच उपाययोजना करता येतात.

उपाययोजना :
खोडकिड्यासाठी महिन्यातून एकदा क्लोरोपायरी२.५ मिली प्रति लिटर + नुवान २.५ मिली प्रति लिटर या प्रमाणात फवारणी घ्यावी. खोडाला घेरूपेस्ट लावावी.

Types Of Soil : शेतकऱ्यांनो ‘हे’ आहेत भारतातील मातीचे प्रकार; वाचा आपल्या शेतातील माती नेमकी कोणती ?

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues