Take a fresh look at your lifestyle.

शेतकरी बांधवांनो, NPK खते म्हणजे काय? जाणून घ्या नेमकं काय आहे फायदा ?

0

Nitrogen (N) Phosphorus (P) Potassium (K). नायट्रोजन फॉस्फोरस आणि पोटॅशिअम. NPK हि त्यांची शास्त्रीय नावे आहेत. NPK हे महत्वाचे पोषक घटकं असून त्याची पिकांना गरज असते हे घटक शेतातील मातीतून मिळत असतात त्याच बरोबर आपण काही रासायनिक आणि सेंद्रिय खताद्वारे हि ते देत असतो. हे घटक इतके महत्वाचे असतात कि याविना पिकांची नीट वाढ होऊ शकत नाही. NPK मधला प्रत्येक घटक वेगवेगळी जबाबदारी पार पाडत असतो. ती आपण आता खालील प्रमाणे पाहणार आहोत.

नत्र Nitrogen (N) :
नत्र हे पिकाच्या पानांची वाढीसाठी जबाबदार असतात. म्हणजेच नत्र दिल्याने पिकांची पानांची वाढ चांगली होते पाने हिरवी गार राहतात. ज्याप्रमाणे प्रथिने (proteins) मानवाच्या शरीराला उपयोगी असतात त्याच प्रमाणे पिकांना हि त्याची गरज असते. ती प्रथिने नत्रा मधून मिळत असतात. जर पिकांची पाने पिवळी दिसत असतील तर नत्राची कमतरता आहे असेल समजावे लागेल. पेशी विभाजनामध्ये नत्राचा उपयोग होत असतो.

स्फुरद Phosphorus (P) :
स्फुरद हा घटक पिकांच्या मूळ वाढीसाठी त्याच बरोबर फुलं आणि फळं वाढीसाठी गरजेचं असतो. पिकाच्या प्रजनन चक्रामध्ये स्फुरद अत्यंत गरजेचं असत. स्फुरद मुळे प्रकाश संश्लेषण क्रिया उत्तम प्रकारे होत असते आणि यामुळेच पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम चांगल्या प्रकारे करत असतात. नत्र प्रमाणेच स्फुरद पण पेशी विभाजनाचे काम करत असते.

पालाश Potassium (K) :
पिकांच्या पानामध्ये छोटे-छोटे छिद्र असतात हि छोटी छिद्र प्रकाश संश्लेषण क्रियेसाठी उघड – बंद होत असतात ज्याच्या वाटे पिके कार्बन डायॉक्साइड घेऊन आक्सीजन तयार करण्याचे काम करत असतात. पिकांना पालाश योग्य प्रमाणात दिल्यास हि छोटी छिद्र योग्य प्रकारे उघड-बंद होतात आणि प्रकाश संश्लेषण क्रियेचे काम योग्य प्रकारे होते. या पाना वाटे तयार झालेले अन्न योग्य त्या ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य पालाश करत असते. उदा. ऊसाच्या पानांमधून तयार झालेले अन्न उसाच्या पेरा मध्ये रूपांतरित होते. पालाश योग्य प्रमाणात पिकास मिळाल्यास फळ आणि बिया उत्तम प्रतीच्या बनत असतात. पालाशमुळे पिकांची रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते.

Tricks And Tips : हि सोपी पद्धत वापरून करा धुक्यापासून कांदा पिकाचे संरक्षण

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues