Take a fresh look at your lifestyle.

Will you work for half the salary : निम्म्या पगारात काम करणार का? मंदीतून सावरण्यासाठी या नामांकित भारतीय कंपनीचा कर्मचाऱ्यांना प्रस्ताव

0

Will you work for half the salary : संपूर्ण जगावर सध्या मंदीचं सावट घोंगावत आहे. त्यामुळे अनेक नामांकित व बड्या कंपन्यांमध्ये कर्मचारी कपात सुरु आहे. दरम्यान बंगळुरुतील आयटी क्षेत्रातील नामांकीत कंपनी विप्रोने (Wipro) देखील एक वेगळा निर्णय घेतला आहे. विप्रोकडून आपल्या नवीन कर्मचाऱ्यांन कमी पगारात काम करणार का? अशी थेट विचारणा केली आहे.

नेमके प्रकरण काय?

बिजनेस स्टँडर्डने दिलेल्या माहितीनुसार, Wipro या टेक कंपनीने आपल्या नव्या कर्मचाऱ्यांना एक मेल पाठवला असून हा मेल अशा कर्मचाऱ्यांना पाठवला आहे ज्यांची वार्षिक उत्पन्न 6.5 लाख रूपये आहे ते सध्या ऑन रोल जाण्याच्या प्रतीक्षेत आहे त्या कर्मचाऱ्यांना हा ईमेल पाठवण्यात आला आहे. या ईमेल मध्ये कर्मचाऱ्यांना थेट 3.5 लाख सॅलरीवर रुजू होण्याची तयारी आहे का? असा सवाल केला आहे. विप्रोच्या 2022 च्या ग्रॅज्युएट बॅचमधील कर्मचारी ऑनरोल जाण्याच्या प्रतीक्षेत अनेक महिन्यांपासून आहे. परंतु कंपनीकडून आलेल्या मेलनंतर कर्मचारी गोंधळले आहे. सध्या असणाऱ्या सॅलरीच्या (Salary) अर्ध्या सॅलरीवर त्यांना जॉब ऑफर (Job Offer) केला आहे. त्यामुळे नव्या कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण झाले आहे

कंपनीने आपल्या ईमेलमध्ये काय लिहिले?
कंपनीने उमेदवारांना पाठवलेल्या ई-मेलमध्ये असे म्हंटले आहे कि, आमच्याकडे प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी जागा खाली आहेत. आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांना ही संधी देऊ इच्छित आहे. जर कोणी इच्छुक असेल तर त्यांना मार्च 2023 पासून ऑनबोर्ड घेण्यात येईल. या अगोदरच्या सर्व ऑफर बरखास्त करण्यात आलेल्या आहेत.

दरम्यान, कंपनीच्या या मेलमुळे इच्छुक उमेदवार गोंधळून गेले असून त्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. तर मेलनंतर कर्मचारी गोंधळले आहे. सध्या असणाऱ्या सॅलरीच्या अर्ध्या सॅलरीवर त्यांना जॉब ऑफर केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues