Take a fresh look at your lifestyle.

What is AM & PM : आपल्या घड्याळामध्ये AM आणि PM का लिहिलेले असते? जाणून घ्या या शॉर्ट फॉर्मचा नेमका अर्थ काय

0

आपल्या सर्वांना माहिती आहे कि घड्याळ हे माणसाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग आहे. आजच्या काळात घड्याळाला माणूस नाही तर माणसाला घड्याळ चालवतं, असं म्हटलं तर वावगं ठरू नये. वेळ सांगताना 12 ताशी घड्याळात AM आणि PM असं नेहमीच लिहिलं जातं. मात्र, वेळेसोबत या शब्दांचा काय संबंध आणि त्याचा नेमका अर्थ काय हे कदाचित आजही काही लोकांना माहिती नसते.

खरं तर AM आणि PM हे दोन्ही शब्द मूळचे लॅटिन भाषेतील असून नंतर त्यांनी इंग्रजी भाषेत जागा मिळवली आहे. आता या शब्दांचा सर्रास वापर केला जातो. AM म्हणजे Ante Meridiem म्हणजेच मध्यरात्रीनंतरची वेळ. तर PM म्हणजे Post Meridiem म्हणजे दुपारी 12 नंतरची वेळ. दुपारी बारानंतर PM वापरले जाते. म्हणूनच घड्याळात 12 तासांची देखील पद्धत असते.

दरम्यान, जगभरात वेगवेगळ्या देशांमध्ये वेगवेगळी वेळ सांगण्याची पद्धत आहे. अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया अशा काही देशांमध्ये 12 तासी घड्याळाचा उपयोग केला जातो. दुसरीकडे दिवसात 24 तासाच्या वेळ प्रकाराला इजिप्तच्या लोकांना जबाबदार धरलं जातं. असं सांगितलं जातं की इजिप्तचे लोक बोटांवर मोजायचे. त्यात अंगठ्याला मोजलं जायचं नाही. तेथूनच जगात 24 तासी वेळ सांगण्याची पद्धत पुढे आल्याचं बोललं जातं.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues