Saving Account वर कोणती बँक किती व्याज देते? एका क्लिकवर घ्या जाणून
कोणत्याही नवीन बँकेत खाते उघडण्यापूर्वी किंवा जुन्या खात्यात पैसे जमा करण्यापूर्वी तुम्हाला बचतीवर अर्थात सेविंगवर किती व्याज मिळतो, हे माहिती असणे आवश्यक आहे. अनेकदा आपण पैसे जमा करण्यासाठी बचत खात्याचा उपयोग करतो. कारण बचत खात्यात (Saving Account) पैसे जमा केल्यामुळे तुम्हाला ते पैसे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत काढता येतात.
मात्र हे पैसे जमा करताना तुम्हाला कोणत्या बचत खात्यावर किती व्याज मिळतो याची माहिती असणेही तितकेच गरजेचे असते. त्यामुळे बचत खात्यातील जमा केलेल्या रक्कमेवर जास्त व्याज मिळाल्याने तुम्हाला अधिक फायदा होतो. त्यामुळे आज आपण जाणून घेऊया कोणत्या बँकेच्या सेविंग अकॉऊंटवर (Saving Account) किती व्याज मिळते ते सविस्तर…
कोटक महिंद्रा बँक : कोटक महिंद्रा बँक विविध ग्राहकांसाठी त्याच्या निवासी स्थितीच्या आधावर नेहमीच बचत खाते प्रदान करत असते. त्यामुळे बचत खात्याचे घरगुती आणि अनिवासी दोन्हीही धारक 3.50% प्रतिवर्ष ते 4.00% प्रतिवर्ष पर्यंत व्याजदर देतात.
अॅक्सिस बँक : भारतातील सर्वोच्च वित्तीय संस्थांपैकी एक अॅक्सिस बँक आहे. ही बँक ग्राहकांच्या विविध मागण्यांसाठी तयार केलेली विविध बचत खाती ऑफर करते. आपल्या सर्व बचत खात्यांवर, अॅक्सिस बँक 3.00% प्रति वर्षापासून ते 3.50% प्रति वर्षपर्यंत व्याज दर ऑफर करते.
एसबीआय : स्टेट बँक ऑफ इंडिया विविध ग्राहक वर्गाच्या उद्देश्याने विविध प्रकारचे बचत खाते प्रदान करते. ज्यामध्ये मूळ बचत खाते, बचत प्लस खाते, युवा बचत खाते आणि अनेक प्रकारांचा समावेश असतो. एसबीआय बचत खात्यांसाठी 2.70% प्रतिवर्ष व्याज देते.
सिटीबँक : भारतातील सर्वात प्रसिद्ध विदेशी बँकांमधील एक म्हणजे सिटी बँक आहे. ही बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे सेविंग अकाउंट्स प्रदान करते. ज्यामध्ये सिटीबँक सेविंग अकाउंट, सिटीबँक सुविधा सॅलरी अकाउंट अशा विविध अकाउंट्सचा समावेश आहे. ही बँक 2.50% प्रतिवर्ष व्याज प्रदान करते. या बचत खात्यांवरील व्याजदर, हा दररोजच्या सेविंग रकमेवर गोळा केला जातो आणि वर्षातून दोनदा जमा केला जातो.
टीप : वरील बातमी प्राथमिक स्वरूपाची आहे.. ग्राहकांनी बचत खाते उघडण्यापूर्वी जरूर याची खात्री करून घावी