Take a fresh look at your lifestyle.

Ved : सहाव्या दिवशीही रितेशच्या सिनेमाने चाहत्यांना ‘वेड’; आतापर्यंत जमावलंय इतक्या कोटी रुपयांचा गल्ला

0

अभिनेता रितेश देशमुखचे दिग्दर्शनात पदार्पण आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुखचे (Riteish and genelia – ved movie) मराठीमध्ये पदार्पण असा दुहेरी योग साधणारा सिनेमा ‘वेड’ (Ved movie) प्रेक्षकांचे मन जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. सिनेमाने अवघ्या सहा दिवसांमध्ये कोट्यवधींची कमाई केली असून या वीकेंडपर्यंत हा सिनेमा मोठा गल्ला जमावण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

रितेश व जिनिलियाच्या हा चित्रपट 2022 वर्षाच्या अखेरीस म्हणजे 30 डिसेंबर प्रदर्शित झाला असून या सिनेमानं सध्या अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं आहे. होय, प्रदर्शनानंतर फक्त 6 दिवसांतच या चित्रपटाने दमदार कमाई केली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत साधारण महाराष्टातून 18 कोटी च्या आसपास कमाई केली आहे. जाणून घ्या सहा दिवसात रितेशच्या या ब्लॉकब्लस्टर सिनेमाने किती रुपयांची कमाई केली आहे.

सहा दिवसात ‘वेड’ने किती कमावले?

  • पहिला दिवस (शुक्रवार, 30 डिसेंबर)- 2.25 कोटी
  • दुसरा दिवस (शनिवार, 31 डिसेंबर)- 3.25 कोटी
  • तिसरा दिवस (रविवार, 01 जानेवारी)- 4.50 कोटी
  • चौथा दिवस (सोमवार, 02 जानेवारी)- 3.02 कोटी
  • पाचवा दिवस (मंगळवार, 03 जानेवारी)- 2.65 कोटी
  • सहावा दिवस (बुधवार, 04 जानेवारी)- 2.55 कोटी
  • एकूण कमाई- 18.22 कोटी

दरम्यान, आता वेड सिनेमा वीकेंडपर्यत बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल, याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून असून आता हा सिनेमा मराठी सिनेमांच्याबाबतीत बॉक्स ऑफिसवर कोणते रेकॉर्ड मोडेल हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues