Take a fresh look at your lifestyle.

Today’s Gold Rate : रेकॉर्ड ब्रेक! सोन्याचा आणखी एक नवा उच्चांक, किंमत पाहूनच फुटेल घाम

0

लग्नसराईमुळे भारतीय नागरिकांची सोनं खरेदी वाढली आहे. जानेवारी ते जून महिन्यात लग्नाचे अनेक मुहूर्त असल्याने भारतीय बाजारात सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात असते. अशा परिस्थितीमध्ये मात्र आज सोन्याने नवा उच्चांक गाठला आहे. सोन्याचा हा नवा रेकॉर्ड पाहून आज तुम्हाला हि घाम फुटेल. काय आहे सोन्याचा आजचा दर? (Today’s Gold Rate) सोन्याने कोणता रेकॉर्ड तोडला? जाणून घ्या सविस्तर…

आज भारतीय बाजारात सोन्याचे दर 56,950 रुपयांच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही आज सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज म्हणजे 16 जानेवारी रोजी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोन्याचा भाव 0.31 टक्क्यांनी वधारला आहे. तर चांदीच्या दरात आज 0.71 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

सोन्याची शुद्धता अशी ओळखावी

24 कॅरेट सोने सर्वात शुद्ध आहे, पण पूर्ण 24 कॅरेट सोन्याचे दागिने बनविणे शक्य नाही. सामान्यपणे 22 कॅरेट सोन्याचा वापर दागिने बनवण्यासाठी केला जातो. ज्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. जर तुम्ही 22 कॅरेट सोन्याचे दागिने घेत असाल तर तुम्हाला हे माहित असले पाहिजे की 22 कॅरेट सोन्यामध्ये 2 कॅरेट इतर धातू मिसळले गेले आहेत. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues