Take a fresh look at your lifestyle.

Tax Saving Tips : आता गुंतवणूक न करताही तुम्हाला वाचवता येईल टॅक्स, त्यासाठी जाणून घ्या काही खास टिप्स

0

Tax Saving Tips : मार्च महिना अर्ध्याच्या वर संपला आहे. आणि अशा परिस्थितीत अनेक लोक विविध टॅक्स सेविंग गुंतवणूक ऑप्शन शोधत आहोत. याच कारणामुळे आम्ही तुम्हाला आज टॅक्स सेविंगच्या खास टिप्सविषयी माहिती देणार आहोत. या टिप्सचा वापर करून तुम्हाला टॅक्स वाचवता येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार.. जर तुम्हाला आयकर कलम 80C अंतर्गत कर सूट मिळवायची असेल, तर तुम्ही PPF, NPS, ELSS, कर बचत FD इत्यादी अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकता. याद्वारे तुम्हाला एकूण 1.5 लाख रुपयांची सूट मिळू शकते. एवढेच नव्हे तर जर तुमची ही लिमिट संपली असेल तर तुम्ही इतर पर्यायांद्वारे कर सूट मिळवू शकता.

तुम्ही तुमच्या मुलांची ट्यूशन फीस देत असाल तर तुम्ही टॅक्स सेविंगसाठी क्लेम करू शकता. तुम्ही फक्त दोन मुलांची ट्यूशन फीस क्लेम करू शकता. तसेच जर तुमच्या मुलांना स्कॉलरशिप मिळाली असेल, तर तुम्ही आयकर कलम 10(16) अंतर्गत स्कॉलरशिपमध्ये मिळालेल्या रकमेवर कर सूट मागू शकता.

तुम्ही रेंटच्या घरात राहत असल्यास, तुम्ही आयकर कलम 80GC अंतर्गत रेंटच्या रकमेवर टॅक्स सूटचा दावा करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त 10BA फॉर्म भरावा लागेल. याशिवाय तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाला देणगी दिल्यास, तुम्ही त्यावर आयकर कलम 80GGC अंतर्गत क्लेम करू शकता.

दरम्यान, याशिवाय, जर तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या शिक्षणासाठी एज्युकेशन लोन घेतले असेल, तर तुम्ही कर्जाच्या व्याजावर कर सूट मिळवू शकता.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues