Take a fresh look at your lifestyle.

Business Ideas : शेतकऱ्यांनो, कमी खर्चात व कमी कालावधीत करा या पिकाची लागवड. होईल बक्कळ कमाई

0

Business Ideas : वाचकांनो, भारतात मोठ्या प्रमाणात भाजीपालावर्गीय पिकांची शेती केली जाते. याशिवाय शेतकरी बांधव कमी दिवसात काढणीसाठी येणाऱ्या पिकांची देखील मोठ्या प्रमाणात शेती करत असतात. विशेष म्हणजे कमी कालावधीत काढणीसाठी येणाऱ्या पिकांची शेती शेतकऱ्यांसाठी मोठी फायदेशीर सिद्ध होतं असते.. आज आपण देखील या लेखात अशाच एका पिका बाबत जाणून घेऊया…

बीट हे थंड हवामानातील पिक असून बीटची प्रत, रंग, चव आणि उत्पादन थंड हवामानात चांगले येते. थंड हवामानात साखरेचे प्रमाण वाढते. जास्त तापमानात मुळांना चांगला रंग येत नाही. तापमान 10 अंश सेल्सीअसपेक्षा कमी झाल्यास बीटच्या खाण्यायोग्य मुळांची पुर्ण वाढ न होताच पीक फुलावर येते. तर बीट पिकाची लागवडीचा हंगाम हा देखील थंड असतो

लागवडीचा हंगाम : बीट हे थंड हवामानात वाढणारे पिक असून पिकाच्या वाढीसाठी थंड हवामान पोषक असते. बीटच्या रब्बी हंगामातील लागवडीसाठी बियांची पेरणी ऑक्टोबरमध्ये करावी. महाराष्ट्रातील हवामानात बीटचे पीक खरीप हंगामातही घेतले जाते. त्यासाठी बियांची पेरणी जून-जुलै महीन्यात केली जाते. बीट पिकाला पाण्याची जास्त गरज नसल्याने आठ ते दहा दिवसांनी पाणी द्यावे.

तसेच, शेतकरी मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयोडीन, पोटॅशियम, लोह, व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-बी समृद्ध असलेल्या बीटाची लागवड करू शकतात. बीटासाठी 18-21 डिग्री सेल्सियस तापमान योग्य असते. बीट लागवडीसाठी वालुकामय चिकणमाती फायदेशीर ठरते.

बीट लागवडीसाठी 50 किलो युरिया, 70 किलो डाय-अमोनियम फॉस्फेट आणि 40 किलो पोटॅश प्रति एकरी पाण्यात मिसळावे. शेतात सेंद्रिय खताचा वापर केल्याने चांगले परिणाम मिळतात आणि बीट जास्तीत जास्त आकाराने मोठे होण्यास मदत होते. बीट पिकातील तण नियंत्रणासाठी 25 ते 30 दिवसांनी तण काढणे आवश्यक आहे. बीट 2-3 महिन्यांच्या कालावधीनंतर काढणीस येते. प्रति हेक्टरी सरासरी 30-40 क्विंटल उत्पादन निघते. शेतकर्‍यांना त्यांच्या मालाला किलोमागे 20 ते 50 रुपये भाव मिळतो. त्यामुळे शेतकरी कमी कालावधीमध्ये बीटाची लागवड करून चांगले उत्पादन घेऊ शकतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues