Take a fresh look at your lifestyle.

Sugar Production : देशात ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीमध्ये साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ; विक्रमी उत्पादन

0

Sugar Production देशात साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाली आहे. या तिमाहीत (ऑक्टोबर ते डिसेंबर) देशातील साखरेचं उत्पादन 120 लाख टनांवर गेलं आहे. यावरुन देशातील साखरेच्या उत्पादनात मोठी वाढ झाल्याचे समजते.

देशातील विविध राज्यात साखरेचं बंपर उत्पादन झालं आहे. त्यामुळं सध्या साखरेचा विक्रमी साठा झाला आहे.

Sugar Production चालू ऊस गाळप हंगामाच्या तिमाहीत म्हणजेच ऑक्टोबर-डिसेंबरची आकडेवारी समोर आली आहे. या तिमाहीमध्ये साखरेचं विक्रमी उत्पादन झालं आहे. देशातील साखरेचे उत्पादन 3.69 टक्क्यांनी वाढून 120.7 लाख टन झाले आहे.

Sugar Production भारत हा साखर उत्पादन करणारा जगातील आघाडीवरचा देश आहे. गेल्या वर्षी याच हंगामात 116.4 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. त्यात यंदा वाढ झाली आहे.

Sugar Production साखर कारखानदारांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षी 500 साखर कारखान्यांनी ऊसाचं गाळप केले होते. तर यंदा ते 509 साखर कारखान्यांकडून ऊसाचं गाळप सुरु आहे.

महाराष्ट्रातील साखर उत्पादन 2022-23 च्या ऑक्टोबर-डिसेंबर या कालावधीत 45.8 लाख टनांवरून 46.8 लाख टनांपर्यंत वाढले आहे. उत्तर प्रदेशातील साखरेचे उत्पादन 30.09 लाख टनांवर पोहोचले आहे

कर्नाटकातील साखरेचे उत्पादन 26.01 लाख टनांच्या तुलनेत 26.27 लाख टनांवर गेले आहे. गुजरातमध्ये 3.8 लाख टन, तामिळनाडूमध्ये 2.6 लाख टन आणि इतर राज्यांमध्ये 9.9 लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.

सध्या ऊसाचा गळीत हंगाम सुरु आहे. पुढचे दोन ते तीन महिने ऊसाचा गळीत हंगाम सुरु राहणार आहे. त्यामुळं उत्पादनात वाढ होणं अपेक्षीत आहे.

Bank Privatisation : देशातील ‘या’ बँकांचे खाजगीकरण होणार नाही, सरकारकडून नवी यादी जाहीर

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues