Take a fresh look at your lifestyle.

cricket update : हार्दिकच्या टोळीने केले लंकादहन; हा युवा खेळाडू पदार्पणाच्या सामन्यातच ठरला हिरो

0

भारतीय संघाने श्रीलंके विरुद्ध 2023 या वर्षातील पहिला सामना मंगळवारी (3 जानेवारी) (india vs sri lanka T20 match) मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर खेळाला. या सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 162 धावा काढल्या व श्रीलंकेला विजयासाठी 163 धावांचे लक्ष दिले. 163 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या श्रीलंका संघाची सुरुवात अडखळत झाली. कारण श्रीलंकेच्या फलंदाजांना थक्क करणारा वेगवान गोलंदाज शिवम मावी या सामन्याचा हिरो ठरला.

शिवम मावी का ठरला हिरो :

पदार्पणाच्या सामन्यात हिरो ठरलेल्या शिवम मावीला या संधीसाठी तब्बल 6 वर्षे वाट पाहावी लागली. 24 वर्षीय शिवम मावीला टीम इंडियामध्ये स्थान मिळाले आणि त्याने शानदार पद्धतीने पदार्पण केले. त्याने या सामन्यात प्रत्येक षटकात विकेट घेत सर्वांनाच थक्क केले. शिवम मावीने या सामन्यात 22 धावांत 4 मोठे विकेट घेत धमाकेदार पदार्पण केले.

2018 मध्ये आयपीएल आणि प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये त्याने पदार्पण केले. 2018 च्या अंडर-19 विश्वचषकातही त्याला स्थान मिळण्याचे हेच कारण होते. त्यानंतर पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला हरवून विजेतेपद पटकावले. त्या फायनलमध्ये देखील शिवम मावीने एक विकेट घेतली होती.

सामन्यानंतर शिवम म्हणाला..

सामना संपल्यानंतर शिवमने स्वतः सांगितले की, ‘मी 6 वर्षांपासून वाट पाहत होतो. मी या 6 वर्षात सतत मेहनत करत होतो, मध्ये मला दुखापत झाली होती. तेव्हा या दुखापतीमुळे मी माझ्या स्वप्नापासून दूर राहीन असे वाटले होते. हार्दिक भाईकडून डेब्यू कॅप मिळणे हे स्वप्न पूर्ण होण्यापेक्षा कमी नाही. पदार्पण करून आपल्या संघासाठी कामगिरी करणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हार्दिक भाई मला सतत सकारात्मक ठेवत आणि माझ्याशी सतत बोलत राहिले. माझी पहिली विकेट सर्वात आवडती होती कारण मी समोरच्या फलंदाजाला क्लीन बोल्ड केले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues