Take a fresh look at your lifestyle.

Sports News : आताच्या घडीच्या क्रीडाक्षेत्रातील दोन महत्वाच्या घडामोडी..!!

0

Sports News तुम्ही जर क्रिकेट प्रेमी असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. कारण विराट कोहलीने टी-20 क्रिकेटबाबत मोठा निर्णय घेतला असून त्याचा या निर्णयानंतर क्रिकेट चाहत्यांना मोठा धक्का बसला असल्याचे सांगण्यात आले आहे. तर दुसरीकडे काल उशिरा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 या दोन्ही मालिकेसाठी भारतीय संघ बीसीसीआयने जाहीर केला आहे या संघात अनेक दिग्गजांना संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे जाणून घ्या नेमके काय घडले आहे क्रीडाक्षेत्रात त्यासाठी पुढील बातमी सविस्तर वाचा..

Sports News विराट कोहलीचा टी-20 क्रिकेटबाबत मोठा निर्णय, चाहत्यांना मोठा धक्का :

Sports News भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिका येत्या 3 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. पण या मालिकेपूर्वी भारतीय क्रिकेट संघातील स्टार फलंदाज विराट कोहली टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तात्पुरती विश्रांती घेत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे विराट आयपीएल 2023 पूर्वी भारतासाठी क्रिकेटच्या सर्वात लहान फॉरमॅट अर्थात टी20 मध्ये खेळताना दिसणार नाही. विराट कोहलीच्या ब्रेकबद्दल माहिती देताना, बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने इनसाइडस्पोर्ट्सला सांगितली आहे. विराट कोहलीच्या या बातमीनंतर अनेक चाहत्यांना मोठा धक्का बसल्याचे सांगितले जात आहे.

Sports News श्रीलंकेविरुद्धच्या वनडे आणि टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर :

श्रीलंकेविरुद्ध 3 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर करण्यात आला असून या मालिकेत रोहितच्या गैरहजेरीमुळे टी20 संघाचं कर्णधारपद हार्दिक पांड्या कडे दिलं गेलं असून एकदिवसीय संघाची धुरा रोहित शर्मा याच्याकडेच असणार आहे. विशेष म्हणजे सूर्यकुमार यादव याला टी20 संघाचा उपकर्णदार केले आहे.

कसा आहे भारताचा टी20 संघ :- हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), ईशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन दिल, दीपक हुडा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, उमरान मलिक, शिवम मावी, मुकेश कुमार

कसा आहे भारताचा एकदिवसीय संघ :- रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उप कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), ईशान किशन (विकेटकिपर), वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, मोहम्मद शामी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंह

Parenting Tips : जर मुलाला अभ्यास करायला आवडत नसेल तर ‘या’ टिप्सचा होईल फायदा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues