Take a fresh look at your lifestyle.

Sport Update : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका ‘या’ तारखेला रंगणार! पाहा संपूर्ण वेळापत्रक

0

Sport Update : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपली असून आता वनडे मालिका 17 मार्चपासून सुरू होणार आहे. मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सर्व एकदिवसीय सामने भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सुरू होणार आहेत. मात्र पहिल्या वनडे मालिकेत रोहित शर्मा काही कारणास्तव बाहेर असणार आहे. यावेळी भारतीय संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्या करणार आहे. तसेच दुसरीकडे श्रेयस अय्यरही दुखापतीमुळे बाहेर असणार आहे.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे मालिका वेळापत्रक :

सामना दिनांक ठिकाण

पहिला सामना 17 मार्च 2023 मुंबई
दुसरा सामना 19 मार्च 2023 विशाखापट्टणम
तिसरा सामना 22 मार्च 2023 चेन्नई

असा असेल दोन्ही देशाचे संभाव्य संघ?

भारतीय संभाव्य संघ : रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, लोकेश राहुल, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट

ऑस्ट्रेलिया संभाव्य संघ : स्टीव्ह स्मिथ, शॉन अ‍ॅबॉट, अ‍ॅश्टन अगर, अ‍ॅलेक्स कॅरी, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अ‍ॅडम झाम्पा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues