Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Tips and Tricks : स्मार्टफोन चार्ज करताना या चुका टाळा; अन्यथा…

0

अनेकांना फोन सतत वापरण्याची सवय असते. सारखा फोन वापरल्याने फोनचे चार्जिंग कमी होते. चुकीच्या पद्धतीने फोनला चार्जिंग केल्यास फोनच्या बॅटरीचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मोबाईल चार्ज करताना काळजी घेणे आवश्यक आहे. फोन चार्ज करताना या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या. (Avoid these mistakes while charging your smartphone)

फोन पूर्ण चार्ज करू नका : अनेक लोक फोन 100 टक्के चार्ज करतात. पण एका रिपोर्टनुसार, फोन 100 टक्के चार्ज केल्याने फोनची बॅटरी खराब होते.

फोन डिस्चार्ज होईपर्यंत वापरू नये : फोन डिस्चार्ज होईपर्यंत वापरू नये कारण फोनची बॅटरी ही लिथियमची असते. त्यामुळे फोनच्या बॅटरीला जास्त चार्जिंग केल्यास बॅटरी लाईफ खराब होऊ शकती. त्यामुळे फोन पूर्णपणे डिस्चार्ज होण्याआधीच चार्जिंगला लावावा

खराब क्वालिटीचा चार्जर वापरू नका : बरेच लोक कोणत्याही स्मार्टफोनच्या चार्जरने स्मार्टफोन चार्ज करतात. यामुळे स्मार्टफोनची बॅटरी खराब होऊ शकते. खराब क्वालिटीचा चार्जर बॅटरीच्या बॅकअपवर वाईट रीतीने परिणाम करू शकतो. म्हणून नेहमी ओरिजनल चार्जर वापरा.

फोन चार्जिंगला लावून कॉलवर बोलू नका : फोन चार्ज करत असताना कॉलवर बोलणे टाळा. जर तुम्ही चार्जिंग सुरू असताना कॉलवर बोलत असाल तर तुम्हाला करंट बसू शकतो.

रात्रभर स्मार्टफोन चार्ज करू नका : बरेच लोक झोपताना आपला स्मार्टफोन चार्जिंगवर ठेवतात आणि नंतर सकाळी बाहेर काढतात. जास्त चार्जिंग केल्याने आपले डिव्हाइस जास्त गरम होते आणि बर्‍याच वेळा असे केल्याने बॅटरी खराब होऊ शकते. त्यामुळे रात्रभर मोबाईल चार्ज करु नका.

इलेक्ट्रिक उपकरणांपासून फोन ठेवा दूर : फ्रिज, वॉशिंग मशीन, डीव्हिडी प्लेयर इत्यादी उपकरणांजवळ फोन चार्जिंगला लावू नका. कारण इलेक्ट्रिक उपकरण गरम होतात. त्यामुळे या उपकरणांच्या जवळ फोन चार्जिंगला लावल्याने फोन खराब होण्याची शक्यता असते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews