Take a fresh look at your lifestyle.

government schemes : पोस्ट ऑफिसची ‘ही’ योजना तुम्हाला देईल जबरदस्त रिटर्न्स; जाणून घ्या या योजने बाबत सविस्तर

0

तुम्ही जर सरकारी योजनेच्या शोधात असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची!! कारण पुढील लेखात दिलेल्या पोस्ट ऑफिसची या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास पुढील काही वर्षात तुम्हाला जबरदस्त रिटर्न्स मिळणार आहेत. कोणती आहे कि योजना? काय आहेत तिचे फायदे जाणून घेऊया सविस्तर

कोणती आहे हि योजना : भारतीय डाक विभागात अर्थात पोस्ट ऑफिसच्या वेगवेगळ्या योजना हा सर्वसामान्य गुंतवणुकीसाठी चांगला पर्याय मानला जातो. तसेच त्यात गुंतवणूक करणेही सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. तुम्हालाही गुंतवणूक करून दुहेरी फायदा मिळवायचा असेल, तर तुम्ही पोस्ट ऑफिसच्या किसान विकास पत्र (Kisan Vikas Patra Scheme) योजनेत गुंतवणूक करू शकता. या पोस्ट ऑफिस गुंतवणूक योजनेत, ठेवीदाराला त्याच्या ठेवीवर चांगल्या परताव्यासह सरकारी सुरक्षेचा लाभ मिळतो. जर तुम्ही या योजनेत 10 वर्षे गुंतवणूक केली, तर तुमची रक्कम दुप्पट होईल.

या योजनेत किती व्याज मिळतो? : किसान विकास पत्र ही पोस्ट ऑफिस योजना पूर्वीपेक्षा आता अधिक फायदेशीर ठरणार आहे कारण गुंतवलेली रक्कम केवळ 120 महिन्यांत दुप्पट होणार आहे. केंद्र सरकारने 1 जानेवारी 2023 पासून किसान विकास पत्रातील गुंतवणूकदारांचे पैसे 123 महिन्यांऐवजी 120 महिन्यांत दुप्पट करणार आहे. व्याजदरात वाढ झाल्यानंतर किसान विकास पत्रातील गुंतवणुकीवर 7.20 टक्के दराने व्याज मिळेल. यापूर्वी या योजनेअंतर्गत गुंतवणूकदारांना 123 महिन्यांच्या गुंतवणुकीवर 7 टक्के दराने व्याज मिळत होते. नवीन बदलानंतर आता मॅच्युरिटी 10 वर्षांची असेल.

या योजनेत किती रूपयांनी सूरूवात करू शकता? : किसान विकास पत्र योजनेत तुम्ही फक्त 1000 रुपयांपासून सुरुवात करू शकता. यानंतर, 100 रुपयांच्या पटीत गुंतवणूक करता येते. विशेष म्हणजे या योजनेत गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. या अंतर्गत एकल आणि संयुक्त खाते उघडता येते. यासोबतच गुंतवणूकदाराला नॉमिनीची सुविधाही मिळते.

या योजनेसाठी कसे खाते उघडता येणार? किसान विकास पत्र योजनेत खाते उघडणे खूप सोपे आहे. यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये जमा पावतीसह अर्ज भरावा लागेल आणि त्यानंतर गुंतवणुकीची रक्कम रोख, चेक किंवा डिमांड ड्राफ्टमध्ये जमा करावी लागेल. अर्जासोबत तुम्हाला तुमचे ओळखपत्रही जोडावे लागेल. यानंतर, तुम्ही अर्ज आणि पैसे जमा करताच तुम्हाला किसान विकास पत्राचे प्रमाणपत्र मिळेल.

टीप : वरील योजनेच्या नियमात किंवा आणखी काही गोष्टीमध्ये बदल असू शकतात. यामुळे वाचकांनी वरील माहितीची खात्री करून घ्यावी

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues