Take a fresh look at your lifestyle.

Shinde – Fadanvis Government : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय : अतिवृष्टी नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांसाठी 157 कोटींचे अनुदान मंजूर

0

Shinde – Fadanvis Government यंदाच्या वर्षी राज्यात जी काही अतिवृष्टी झाली, त्यामुळे सर्वांचं माहिती आहे कि संपूर्ण महाराष्ट्रमध्ये शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झाले व त्यांना मोठ्या प्रमाणावर याचा आर्थिक फटका बसला. एकंदरीत पहिला गेली कि यंदाच्या अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा विचार केला तर जुलै ते सप्टेंबर 2022या कालावधीमध्ये अतिवृष्टी आणि महापूर इत्यादी कारणांमुळे पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सोबतच यावर्षात ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः थैमान घातले.

Shinde – Fadanvis Government या पार्श्वभूमीवर ऑक्टोबर महिन्यामध्ये जे काही नुकसान झाले त्यासाठी नुकसान भरपाई म्हणून शिंदे-फडणवीस सरकारने 157 कोटी रुपये अनुदानाला मंजुरी दिली असून याबाबतचा शासन निर्णय काल म्हणजेच 23 नोव्हेंबर 2022 रोजी घेण्यात आला आहे.

Shinde – Fadanvis Government काय आहे शासन निर्णय?

Shinde – Fadanvis Government यंदाच्या जुलै ते ऑगस्ट या कालावधीमध्ये राज्यातील जे काही नुकसान झाले त्यासाठी शासनाकडून मदतीचे वितरण करण्यात आले असून सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये जे काही अतिवृष्टीमुळे नुकसान झाले त्या नुकसान भरपाईपोटी पहिल्या टप्प्यात दहा जिल्ह्यांसाठी 1286 कोटी रुपयांची मदत वितरित करण्यात आली असल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

यामध्ये सरकारकडून बऱ्याच जिल्ह्यांमधून मदतीसाठी प्रस्ताव देण्यात आलेले होते परंतु अद्याप पर्यंत काही जिल्ह्यांना मदत दिली गेली नव्हती. यामध्ये जर आपण प्रामुख्याने जर राज्यातील विभागाचा विचार केला तर अमरावती विभागातील पहिल्या टप्प्यामध्ये सर्व जिल्ह्यांना मदत देण्यात आलेली होती.. परंतु या विभागातील बुलढाणा जिल्ह्याला मात्र आतापर्यंत सरकारकडून कोणताही मदतीचा हात दिला गेला नव्हता. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांमध्ये त्यामुळे संतापाचे वातावरण पसरले होते. या पार्श्वभूमीवर आज शासनाने महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेऊन अमरावती विभागासाठी 157 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues