Take a fresh look at your lifestyle.

uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत दिली महाराष्ट्र बंदची हाक!! नेमके प्रकरण काय? वाचा सविस्तर

0

uddhav thackeray : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी bhagatsingh koshyari यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. त्यातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे प्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत आक्रमक भूमिका घेतली आहे.

uddhav thackeray : उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वदाग्रस्त वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला असून राज्यपालांसोबतच ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर देखील जोरदार निशाणा साधला.

uddhav thackeray : काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राज्यापाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्य बाबत उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला आहे. राज्यपालांकडून महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ चालू आहे. ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही त्यांना राज्यपाल नेमलं आहे. महाराष्ट्र द्रोह्यांना इंगा दाखवण्यासाठी एकत्र या, केंद्रानं पाठवलेलं सॅम्पलं वृद्धाश्रमात पाठवा. राज्यपालांना हटवलं नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, एवढेच नव्हे तर महाराष्ट्र बंदचा इशाराही उद्धव ठाकरे यांच्या कडून या वेळी देण्यात आला आहे.

राज्यपाल कोश्यारींनी याआधीही मराठी माणसांचा अपमान केला होता. या सडक्या मेंदूच्या मागील मेंदू कोण आहे, याचा शोध घेण्याची वेळ आली आहे,’ असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भगतसिंह कोश्यारी यांच्यासह केंद्र सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

दरम्यान, लवकरात लवकर राज्यपाल कोश्यारी यांना पदावरून हटवा, या उद्धव ठाकरे यांनी केलेल्या मागणीला केंद्र सरकारकडून नेमका कसा प्रतिसाद दिला जातो आणि खरंच राज्यपालांकडून पदभार काढून घेतला जातो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup

Leave A Reply

Your email address will not be published.