Take a fresh look at your lifestyle.

Ratoon Cane Management : फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात तूटलेल्या उसाचाच खोडवा ठेवणं योग्य; त्यानंतर खोडकिडीचा प्रादुर्भाव होतोय

0

Ratoon Cane Management सध्या ऊसतोड सुरु आहे, उस तुटून गेल्यानंतर खोडवा व्यवस्थापनाबाबत अनेक प्रश्न शेतकऱ्यांना पडलेले असतात. अनेक शेतकरी हे उसाचा खोडवा ठेवतात. यामुळे याचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक आहे.

Ratoon Cane Management खोडवा पीक घेताना सर्वसाधारणपणे १५ फेब्रुवारीपर्यंत तुटलेल्या उसाचाच खोडवा ठेवावा. त्यानंतर घेतलेल्या खोडवा उसावर खोडकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो. यामुळे उत्पादन घटते.

हेही वाचा : आता साखर कारखान्यांमधील अंतर 25 किमी वरून 15 किमीवर येणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा

Ratoon Cane Management तसेच खोडवा ठेवायची जमीन सुपीक आणि निचऱ्याची असावी. हे पीक १२ ते १४ महिने वयाचे असताना उसाची तोड होणार असेल तरच खोडवा ठेवावा. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की, जसजसा खोडवा राखण्यास उशीर होतो तसतसे खोडव्याचे उत्पादन कमी होत जाते.

Ratoon Cane Management उशिरा तुटलेल्या उसाचा खोडवा ठेवला तर त्याचे उत्पादन जेवढे कमी होते तेवढा खर्च शेतकऱ्यांना होतो. यामुळे हाती काही लागत नाही. म्हणून १५ फेब्रुवारी नंतर तोडलेल्या उसाचा खोडवा ठेवू नये.

Ratoon Cane Management खोडवा ठेवताना पाचट जाळणेपाचट शेताबाहेर काढने, एक आड एक सरीत ठेवणे, बुडख्यांवर पाचट ठेवणे, रासायनिक खतांचा फेकून वापर करणे, आंतरमशागत व मोठी बांधणी करणे, बगला फोडणे, या गोष्टी करू नयेत. तरच उत्पादनात वाढ होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues