Take a fresh look at your lifestyle.

IND vs BAN : पराभवानंतर टीम इंडियाच्या संघात मोठा बदल; ‘या’ खेळाडूची रॉयल एंट्री

0

IND vs BAN टीम इंडियाची बांगलादेश दौऱ्याची सुरुवात पराभवानं झालीय. दोन्ही देशांच्या संघांदरम्यान खेळलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात टीम इंडियाची फलंदाजी सपशेल फ्लॉप राहिली, त्यामुळं संघाला 1 विकेटनं पराभवाला सामोरं जावं लागलं. या मालिकेतील दुसरा सामना आता 7 डिसेंबरला शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळल्या जाणार आहेत. या सामन्यांसाठी कर्णधार रोहित शर्मा प्लेइंग-11 मध्ये अनेक मोठे बदल करू शकतो. संघाची फ्लॉप फलंदाजी पाहून धडाकेबाज फलंदाजाला खेळण्याची संधी मिळू शकतेय.

IND vs BAN पहिल्या एकदिवसीय सामन्यात केएल राहुलशिवाय टीम इंडियाच्या एकाही फलंदाजाला 30 धावांचा आकडा गाठता आला नाही. भारतीय फलंदाजांच्या या खराब कामगिरीनंतर 31 वर्षीय फलंदाज राहुल त्रिपाठीला प्लेइंग-11 मध्ये स्थान दिले जाऊ शकते. सलामीशिवाय राहुल त्रिपाठी मधल्या फळीतही फलंदाजी करू शकतो. जरी तो अद्याप टीम इंडियासाठी एकही सामना खेळलेला नाही.

हेही वाचा : ‘या’ 5 बँका देत आहेत स्वस्तात गृहकर्ज, घर घेण्याचा विचार करत असाल तर नक्की वाचा!

IND vs BAN राहुल त्रिपाठी बऱ्याच दिवसांपासून पदार्पणाच्या सामन्याची वाट पाहत आहे. क्रिकेट लीग 2022 मध्ये राहुल त्रिपाठीने 14 सामन्यात 414 धावा केल्या होत्या. या चमकदार कामगिरीमुळे त्याला संघात स्थान देण्यात आलंय. या मालिकेपूर्वी 4 मालिकेत त्याला टीम इंडियाच्या संघात स्थान दिलं होतं, मात्र या सर्व मालिकेत त्याला बेंचवर बसावं लागलं होतं. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली राहुल त्रिपाठी दुसऱ्यांदा संघाचा भाग बनलाय. यापूर्वी, इंग्लंड दौऱ्यावर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली केवळ 1 टी-20 सामन्यासाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला होता.

IND vs BAN पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेशनं नाणेफेक जिंकून टीम इंडियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. पण टीम इंडियाची फलंदाजी पूर्णपणे फ्लॉप ठरली आणि 41.2 षटकांत 186 धावा करून गडगडली. या लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेशनं 136 धावांत 9 विकेट गमावल्या होत्या, मात्र 10 व्या विकेटसाठी मेहदी हसन मिराज आणि मुस्तफिझूर रहमान यांनी अर्धशतकी भागीदारी करत टीम इंडियाच्या तोंडाला पानं पुसल्याचं पाहायला मिळतंय.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues