Take a fresh look at your lifestyle.

Credit Card: क्रेडिट कार्डच्या अतिवापरामुळं कर्जाच्या जाळ्यात अडकलाय? जाणून घ्या बाहेर पडण्याचा मार्ग

0

क्रेडिट कार्डबद्दल सर्वांच्याच मनात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. क्रेडिट कार्डबद्दलचा सर्वात मोठा गैरसमज म्हणजे क्रेडिट कार्ड ग्राहकांना कर्जाच्या जाळ्यात अडकवतात. तुम्हीही क्रेडिट कार्डच्या कर्जाच्या जाळ्यात अडकला असाल तर यातून बाहेर पडण्याचे पुढील लेखात काही उपाय नक्की जाणून घ्या…

कर्जाच्या जाळ्यात अडकल्यावर काय करावे?

  • सर्वात सोपा आणि योग्य मार्ग म्हणजे तुमच्या आजूबाजूच्या लोकांकडून काही बचत किंवा आर्थिक मदत घेऊन तुम्ही क्रेडिट कार्ड कर्जाच्या सापळ्यातून बाहेर पडू शकता.
  • आर्थिक मदत घेताना थोडा वेळ नक्कीच मागा. याचा फायदा असा होईल की जवळच्या व्यक्तींकडून कर्ज घेऊन तुम्ही व्याजाची आव्हाने तर टाळालच पण थोडी बचतही होईल.
  • यानंतर, तुम्ही तुमच्या सोयीनुसार कर्जाची परतफेड करू शकता. जवळच्यांचे ऋण लवकरात लवकर फेडले जावेत यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
  • तसेच, अनेक वेळा तुमच्या आजूबाजूचे लोक कर्ज मिळवू शकत नाहीत किंवा कर्ज मागायला कचरतात. अशा परिस्थितीत तुम्ही बॅंकेशी संपर्क साधावा. तसचे तुमच्याकडे जर एक किंवा अधिक क्रेडिट कार्ड असल्यास, त्याचे निराकरण करण्याबद्दल बॅंकेशी बोला.
  • तुमचं क्रेडिट कार्ड बिल ईएमआयमध्ये रूपांतरित करा. यानंतर तुम्ही EMI द्वारे थोडे-थोडे बिल भरू शकता. यासोबतच जर तुम्हाला क्रेडिट कार्डवर जास्त दंडाचा सामना करावा लागत असेल, तर तुम्ही तुमचं क्रेडिट कार्ड बिल दुसऱ्या कंपनीला ट्रान्सफर करू शकता. यानंतर तुम्हाला थोडा वेळ लागेल आणि त्यानंतर तुम्ही बिल भरू शकाल.

दरम्यान, एवढेच नव्हे तर जर क्रेडिट कार्डवर खूप मोठे कर्ज असेल तर खर्चावर देखील नियंत्रण ठेवा. खर्चावर नियंत्रण ठेवून बचत होईल आणि तुम्ही जास्तीत जास्त थकबाकी भरण्यास सक्षम असाल.

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues