Nursery : रोपवाटिका तयार करताना काय काळजी घ्यावी?
Nurseryरोपांची लागवडीपासूनच योग्य काळजी न घेतल्यास रोपे कुमकुवत आणि रोगट होतात. अशा रोपांमुळे पिकांच्या उत्पादनात घट होते आणि खर्चही वाढतो.
Nurseryभाजीपाला पिके (Vegetable Crop) ही हंगामी स्वरूपाची असतात. अनेक रोग व किडींना ते लागवडीपासून ते पीक काढणीपर्यंत बळी पडत असतात. भाजीपाला पिकापैकी पालेभाज्या, गाजर, मुळा, भेंडी, घेवडा इ. बी कायम जागी लावून लागवड करतात, तर टोमॅटो, मिरची, कोबी, फ्लॉवर, कांदा यांसारख्या भाजीपाला पिकांची प्रथम रोपे तयार करून नंतर कायम जागी लावतात.
चला तर बघूया, रोपे तयार करताना रोपवाटिकेची काय काळजी घ्यावी ?
रोपे कशी तयार करावीत ?
१. Nursery रोपवाटिकेकरिता हराळी, लव्हाळा किंवा इतर तण असलेली जमीन वापरू नये.
२. त्यानंतर त्यात गुंठ्याला १ गाडी चांगले कुजलेले शेणखत टाकावे. २० ते २५ सें. मी. खोलीपर्यंत नांगरणी करून २-३ कुळवाच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.
३. जमीन भुसभुशीत केल्यानंतर ३ मी. लांब, १ मी रुंद व १५ ते २० से. मी. उंच आकाराचे गादी वाफे तयार करावेत.
४. भाजीपाल्याचे शुद्ध आणि जातिवंत बी वापरणे उत्पादन वाढण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असते.
५. बियाणे चांगले नसेल तर भाजीपाल्याच्या लागवडीत इतर बाबीवर केलेला सर्व खर्च वाया जाण्याची शक्यता असते.
६. Nursery संकरित बियाण्याचे दर जास्त असल्याने बी टाकताना चांगली काळजी घ्यावी. वाफ्याच्या रुंदीच्या समांतर दीड सें. मी. खोलीच्या हलक्या हाताने रेघा पाडून त्यात बी पातळ पेरावे व हळुवार मातीने झाकावे. दोन ओळींतले अंतर ६ सें. मी. ठेवावे.
७. उन्हाळी हंगामात जमिनीचा वरचा थर कडक होऊ नये म्हणून, तसेच हिवाळ्यात आर्द्रतेत वाढ करण्यासाठी वाफ्यावर पाचट, भात, गहू पिकाचे तूस हलके पसरावे व १० ते २० टक्के मोड दिसू लागल्यावर काढावे.
८. बियांच्या पेरणीनंतर गादी वाफ्यांना झारीने पाणी द्यावे. बियांची उगवण होईपर्यंत आवश्यकतेनुसार सकाळी व सायंकाळी झारीने पाणी द्यावे. बियांची पेरणी झाल्यापासून बी रुजणे, मोड येणे आणि पाने येणे या क्रिया अनुकूल वातावरण असताना पिकानुसार ६ ते ८ दिवसांत होतात.
- Copper Deficiency in Plants : वनस्पतींमध्ये तांब्याच्या कमतरतेचा काय परिणाम होतो, त्याच्या पुरवठ्याची पद्धत जाणून घ्या
- Namo Shetkari Yojana | बाप्पाच्या आगमनापूर्वीचं बळीराजा सुखावणार; ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना लाभ मिळणार, वाचा सविस्तर माहिती
- Suicide Prevention Day : भारतामध्ये आत्महत्यांचे सर्वांत जास्त प्रमाण; वाचा सविस्तर आत्महत्येचे कारण आणि प्रमाण..
Nursery रोपांची काळजी :
Nursery तापमान ३५ अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्यास ७५ टक्के नायलॉन नेट किंवा पांढरे कापड बांबूच्या साह्याने किंवा लोखंडी गज वापरून गादी वाफ्यावर दोन मी. उंचीपर्यंत ठेवून पिंजरा तयार करावा. यामध्ये रोपांची वाढ चांगली होते. तसेच रोपांचे फुलकिडे, पांढरी माशी यांसारख्या किडीपासून संरक्षण होते व विषाणूजन्य रोगाचा प्रसार होत नाही.
साधारणपणे रोपे ३-४ पानांवर असताना दोन ओळींतले तण हाताने काढावे. रोपे ३ -४ पानांवर असताना मिश्र खते प्रति वाफ्यास २० ते २५ ग्रॅम दोन ओळींमध्ये काकरी पडून द्यावी.
Nursery रोपे लागवडीपूर्वी :
१. हंगामानुसार व भाजीपाला पिकानुसार रोपे ४ ते ६ आठवड्यांत लागवडी योग्य होतात.
२. रोपांचे स्थलांतर करण्यापूर्वी एक आठवडा आधीपासून पाण्याची मात्रा हळूहळू कमी करावी म्हणजे रोपे कणखर होऊन स्थलांतरानंतर दगावणार नाहीत.
३. स्थलांतर करण्यापूर्वी २४ तास आधी वाफ्यांना पुरेसे पाणी द्यावे, म्हणजे रोप उपटताना मुळाला फारशी इजा होणार नाही. रोपांचे स्थलांतर नेहमी संध्याकाळच्या वेळेस किंवा ढगाळ वातावरणात करावे.
शेती विषयक बातम्या, शासकीय योजना, महत्वाची माहिती मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप आजच Join करा : https://instabio.cc/krushidootgroup