Take a fresh look at your lifestyle.

Neem Powder For Crops : निंबोळी पावडरचे शेतीमधील कार्य

0

निंबोळी पावडर मध्ये ‘अॅझाडीरेक्टीन’ घटक असल्यामुळे मातीमधील हुमणी, खोडकीड, कटवर्म, वाळवी विषाणु, बुरशी या शत्रूकिटकां-रोगांचा ते नायनाट करते.

निंबोळी पावडर हे संपूर्ण नैसर्गिक स्वरुपामधील निंबोळी पावडर असल्याने जमिनीमधील कोणत्याही उपयुक्त जिवाणुंना हानी पोहचत नाही.
निंबोळी पावडर हे रासायनिक खतांमध्ये मिसळून वापरल्याने रासायनिक खतांमधील नत्र टिकून राहते.
निंबोळी पावडर पिकांचे सूक्ष्मकृमींच्या, सुत्रकृमींच्या प्रादुर्भावापासून 100% संरक्षण करते.
निंबोळी पावडर मर रोगाच्या प्रमाणामध्ये घट करते.
निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीमधील मातीचे कण एकमेकांना चिटकत नाहीत. यामुळे जमिनीमध्ये हवा खेळती राहते.
निंबोळी पावडर जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. तसेच मातीमधील ह्युमसचे प्रमाण वाढवून पिकांच्या पांढरया मुळांची वाढ होण्यास मदत होते.
निंबोळी पावडरच्या वापरामुळे जमिनीचा सामू चांगला राखला जातो. परिणामी ऊत्पादन व गुणवत्ता वाढते.

निंबोळी पावडरच्या वापराचे प्रमाण :

सर्व पिकांमध्ये वापरास योग्य असणारी ही निंबोळी पावडर एकरी 200 किग्रॅ वापरण्याची शिफारस आहे.
फळबागेमध्ये वापर करायचा असल्यास 500 ग्रॅम प्रति झाड या प्रमाणामध्ये चांगल्या कुजलेल्या शेणखतासोबत द्यावे.
सेंद्रिय, रेसिड्यूफ्री, नैसर्गिक, जैविक, एकात्मिक, रासायनिक इ. सर्व शेती प्रकारामध्ये वापराकरिता पूर्ण सुरक्षित आहे.

PM Krishi Udan Yojana : कृषी उडान योजनेचा विस्तार करण्याच्या सरकार तयारीत, 21 अतिरिक्त विमानतळांचा समावेश करण्याची योजना

Gram Suraksha Yojana : शेतकऱ्यांसाठी कमालीची योजना! 50 रुपये गुंतवा आणि 35 लाख मिळेल परतावा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues