Take a fresh look at your lifestyle.

Krushidoot Tips : प्रवास करताना मळमळ होते? वापरा या युक्त्या आणि लुटा प्रवासाचा मनमुराद आनंद

0

आपल्या पैकी अनेक जण हे एकदम हौशी प्रवासी असतात, ज्यांना सतत फिरायला पाहिजे असते. त्यांचा मनमुराद आनंद- छंद फिरणं हा असतो. परंतु काही लोक असेही असतात ज्यांना प्रवास करायला अतिशय आवडतो पण प्रवासात बस लागणं…गाडी लागणं.. मळमळणं, उलट्या होणं या गोष्टी इतक्या त्रासदायक ठरतात, की त्यांची प्रवास करायची इच्छा मरुनच जाते.

खूपदा आपल्या पैकी अनेक जण ट्रीपला बाहेर पडतात आणि रस्त्यात दिसतील ते पदार्थ खातो. त्यांचा दर्जा आपल्याला माहीत नसतो. ते पदार्थ कधी बनवले आहेत हे माहित नसतं. ते जास्त मसालेदार असले, यामुळे त्याचा परिणाम अनेकांना नंतर दिसून येतो. परंतु प्रवासादरम्यान भूक लागली म्हणून खाल्लं जातं, पण त्यामुळे पोटावर ताण येतोच शिवाय मळमळ, उलट्या होणे हा त्रास होतो तो वेगळाच. प्रवास करताना कसंतरी होतं म्हणत, बाहेरचं सृष्टी सौंदर्य न पाहता उलटी होईल या धास्तीने मागे सीटवर मान टाकून बसलेला माणूस किती बिच्चारा वाटतो.

या त्रासावरचे काही साधे सुधे उपाय लक्षात ठेवले, तर हा त्रासदायक प्रवास थोडासा सुसह्य होण्यासाठी मदत होते. आज आम्ही तुम्हाला या लेखात असेच काही उपाय सांगणार आहोत ज्याचा फायदा तुम्ही पुढील वेळी ट्रिपला किंवा प्रवासाला जाताना होईल..

वेलची_ : प्रवासात जाण्याच्या आधी वेलची टाकलेला चहा पिल्यास प्रवासात आरामात मिळतो. तसेच सोबत वेलची नेऊन चघळल्यास मळमळ होत नाही.

आले : आल्यामध्ये ऍन्टी एमेटिक तत्व असतात त्यामुळे आल्याचे प्रवासात सेवन केल्यास ओकारी आणि मळमळीपासून आराम मिळतो.

पुदिना : प्रवासाला निघताना एका बाटलीत लिंबू आणि पुदिन्याचा रस सोबत न्या. जमल्यास त्यात काळे मिठं टाकलत तर फायदाच होईल. यामुळे ओकारी व मळमळ दूर होते.

लवंग : तुम्ही प्रवासात असाल तेव्हा कुटलेली एक चिमूट लवंग साखर किंवा काळ्या मिठासोबत खाल्ली की मळमळीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासात नेहमी लवंग सोबत ठेवावी.

लिंबू : लिंबू हे ओकारी आणि मळमळीवर एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे प्रवासाला जाताना लिंबू सोबत घेऊन जा. जेव्हा मळमळ वाटेल तेव्हा लिंबाचा वास घ्या.

जलजीरा : ओकारीवर उत्तम औषध म्हणजे जलजिरा. यामुळे शरीराला थंडावाही मिळतो व मळमळही थांबते.

मिरे : लिंबावर मिरे पावडर आणि काळं मीठ टाकून ते चाटल्यास ओकारीपासून आराम मिळतो. त्यामुळे प्रवासात सोबत मिरे असुद्या.

Goa Trip : नववर्षात गोव्याला जाण्याचा प्लॅन करताय? मग या गोष्टी नक्की लक्षात ठेवा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues