Take a fresh look at your lifestyle.

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आताच्या घडीची महत्त्वाची बातमी; आता पेपर लिहीताना घ्यावी लागणार ‘ही’ काळजी

0

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) घेण्यात येणाऱ्या राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या बाबतीत महत्त्वाची माहिती समोर आली असून एमपीएससीने या परीक्षा देण्यासंदर्भात महत्त्वाचा बदल केला आहे. MPSCने या संदर्भात ट्विट करत माहिती अधिकृत माहिती दिली आहे.

MPSC च्या ट्विटमध्ये नेमके काय?

मिळालेल्या माहितीनुसार, MPSC मुख्य परीक्षेतील तीन ते सात क्रमांकांचे पाचही पेपर हे आता एकाच भाषेत सोडणवे आवश्यक असणार आहे. त्यामुळे आता परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना एकतर हि परीक्षा मराठी किंवा इंग्रजी या दोनच माध्यमांतून लिहीता येणार आहे.

तसेच लोकसेवा आयोगाने आठ आणि नवव्या क्रमांकाचा पेपर तसेच वैकल्पिक विषयांचे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाचे पेपर हे उमेदवाराने निवडलेल्या भाषेतच द्यावे लागणार असून त्यामुळे जर उमेदवाराने या विषयांचे पेपर लिहिताना मराठी भाषा निवडली असेल तर त्याला मराठीतच पेपर लिहावा लागेल. तसेच जर उमेदवाराने इंग्रजी भाषेचा पर्याय निवडला असेल तर त्याला इंग्रजीतून पेपर लिहावा लागणार आहे.

त्यामुळे उमेदवारांनी वैकल्पिक विषयांसाठी मराठी व इंग्रजी भाषेत पेपर लिहीण्याचे निश्चित केले असेल तर त्याला केवळ दोन्ही पैकी एकाच भाषेत पेपर लिहावा लागणार आहे. उमेदवाराने निवडलेल्या भाषेतूनच त्याला वैकल्पिक भाषेतील पेपर द्यावे लागणार असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राज्य सेवा मुख्य परीक्षा 2021 च्या पुणे केंद्रावरील उमेदवारांच्या दुसऱ्या टप्प्यातील मुलाखती या दिनांक 2 ते 6 जानेवारी, 2023 या कालावधीत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे होणार आहेत.

मोठी बातमी! महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा सोबतच होणार; केंद्रीय मंत्र्यांचा दावा

Leave A Reply

Your email address will not be published.

रिकाम्या पोटी Black Tea पिण्याचे फायदे #blacktea YouTube चे नवीन CEO नील मोहन कोण आहेत? Know About Neal Mohan Drinking water in Morning : रिकाम्या पोटी पाणी पिण्याचे अनोखे फायदे Diabetes Diet : या भाज्या खा, मधुमेह नियंत्रणात राहील #Diabetes #webstory #krushidoot #health tips #health Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues