Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

MahaRojgar Melava : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना सुवर्णसंधी! राज्य सरकारकडून 8500 हुन अधिक पदांसाठी महारोजगार मेळावा

0

MahaRojgar Melava नोकरीच्या शोधात आहात? मग ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची.. कारण राज्य सरकारने आज 8500 हुन अधिक पदांसाठी रोजगार मेळावा ठेवला आहे. या मेळाव्यात विविध नामवंत कंपन्या, उद्योग, कॉर्पोरेट क्षेत्र, सेवा क्षेत्र यामधील 8 हजार 608 इतके रोजगार उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यामध्ये कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई शहर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने शनिवारी (10 डिसेंबर) राणीचा बाग, ईएस पाटनवाला मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई येथे सकाळी 10 वाजेपासून “पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा” आयोजित करण्यात आला आहे.

MahaRojgar Melava मेळाव्याचे उद्घाटन शनिवारी सकाळी 10 वाजता मंत्री लोढा व शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार असून त्याच्यासोबत कौशल्य विकास विभागाचे सचिव तथा आयुक्त डॉ. रामास्वामी एन, मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांच्यासह विविध उद्योजकांच्या उपस्थितीत होणार आहे.

या नामांकित कंपन्यांमध्ये मिळणार नोकरीची संधी :

MahaRojgar Melava बीव्हीजी इंडिया, आयसीजे, स्पॉटलाईट, स्मार्ट स्टार्ट, बझ वोर्क, टीएनएस इंटरप्रायझेस, युवाशक्ती, इम्पेरेटीव्ह, हिंदू रोजगार डॉट कॉम, एअरटेल, रोप्पन ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस, फास्टट्रॅक मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अपोलो होम हेल्थकेअर, स्टेलर सिक्युरिटी अँड फॅसिलीटी सर्व्हिसेस इत्यादी उद्योग, इतर नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत.

कोण या मेळाव्यात सहभागी होऊ शकते? :

या मेळाव्यात दहावी, बारावी, पदवीधर, आयटीआय, पॉलिटेक्नीक, इंजिनीअरींग पदवी इत्यादी पात्रताधारक उमेदवारांसाठी हा मेळावा ठेवण्यात आला आहे.

हेही वाचा : आता चक्क ATM मधून काढता येणार सोने, कार्ड टाकताच मिळणार गोल्ड

Leave A Reply

Your email address will not be published.

Winter Tips & Diet : हिवाळ्यात फिट राहण्यासाठी आहारात हे बदल करा Winter diet winter health tips health tips health in winter winter health issues Salman Khan : या डाएट प्लॅनने सलमान खानसारखे राहा फिट अँड फाइन शेतकऱ्यांसाठी टॉप ५ सरकारी योजना; असा घ्या लाभ Top 5 government scheme for Farmer भारतात वेगाने वाढणारी फळझाडे (fast-growing fruit trees in India) बैलपोळ्यानिमित्त राजकीय घोषवाक्यांनी चर्चेला उधाण #बैलपोळा #bailpola #sajawat #MarathiNews