Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Rain Update : परतीच्या पावसामुळे शेतकऱ्याची तारंबळ, कोकणसह पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा यलो अलर्ट!

0

Maharashtra Rain Update : मुंबईसह ठाणे परिसरात परतीच्या पावसाने चांगलीच नागरिकांची तारंबळ उडवली आहे. विजांचा कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे.

Maharashtra Rain Update : गेल्या काही दिवसांपासून काहीशी विश्रांती घेतलेल्या पावसाने (Rain) पुन्हा जोर धरला आहे. परतीच्या पावसाने राज्यातील अनेक भागांमध्ये मोठे नुकसान केले आहे. परतीच्या पावसाचा सर्वात जास्त फटका बळीराजाला (Maharashtra Farmer) बसला आहे. हाती आलेले पीक हिसकावून घेतल्यामुळे बळीराजा संकटात आला आहे. परतीच्या पावसामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आजही राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आहे. हवामान खात्याने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार, राज्यात आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज कोकणासह पश्चिम महाराष्ट्र (Western Maharashtra) आणि विदर्भात (Vidharbha) पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मुंबईसह ठाणे परिसरात परतीच्या पावसाने चांगलीच नागरिकांची तारंबळ उडवली आहे. विजांचा कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. तर दुसरीकडे राज्यातील बीड, कोल्हापूर, धुळे, पालघर, लातूर, सोलापूर, सांगली, अहमदनगर, पुणे या जिल्ह्यात परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे या भागात मोठे नुकसान झाले आहे. परतीच्या पावसामुळे बळीराजाचे हाती आलेले पीक वाया गेले आहे. अशामध्ये आज देखील राज्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी आणि सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

माहितीपूर्ण पोस्ट्स साठी आमचे फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/teamkrushidoot/

Leave A Reply

Your email address will not be published.